Patbandhare Vibhag Recruitment 2024 : पाटबंधारे विकास मंडळ, ठाणे अंतर्गत ‘वकील’ या पदासाठी रिक्त जागांवर भरती केली जात आहे. ही भरती विविध शहरांमध्ये केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज कसा आणि कुठे करायचा ते पाहा. तसेच नोकरीसाठीचे पात्रता निकष जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Patbandhare Vibhag Recruitment 2024 : कोणत्या शहरांमध्ये भरती होत आहे.

पाटबंधारे विकास मंडळ, ठाणे अंतर्गत वकील या पदासाठी सध्या भरती सुरू आहे.
त्यामध्ये रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक या ठिकणी भरती केली जाणार आहे.

हेही वाचा : BMC Recruitment 2024 : ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेत’ नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करू शकतात अर्ज….

Patbandhare Vibhag Recruitment 2024 – पाटबंधारे विकास मंडळ, ठाणे अधिकृत वेबसाईट –
https://wrd.maharashtra.gov.in/

Patbandhare Vibhag Recruitment 2024 – अधिसूचना –
https://wrd.maharashtra.gov.in/Site/Upload/PDF/KIDC-thaneAdd-shuddhi.pdf

Patbandhare Vibhag Recruitment 2024 : निवड प्रक्रिया

पाटबंधारे विकास मंडळ, ठाणे अंतर्गत वकील पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
अर्ज आणि अनुभव यास ४० मार्क असतील.
मुलाखतीस ६० मार्क असतील.
जो उमेदवार किमान ५०% गुण प्राप्त करेल, त्याची निवड करण्यात येईल.

Patbandhare Vibhag Recruitment 2024 : पात्रता निकष

तसेच त्या उमेदवाराकडे वकिली क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारास कॉम्प्युटराइझ्ड सिस्टीम / ई-मेल/ इंटरनेटचे ज्ञान असावे.
तसेच, ते कसे वापरायचे याची उमेदवारास माहिती असणे आवश्यक आहे.

Patbandhare Vibhag Recruitment 2024 : अर्ज कुठे आणि कसा करावा

वकील पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अर्जाचा फॉर्म भरून ई-मेलद्वारे पाठवायचा आहे.
अर्जाचा फॉर्म नोकरीच्या अधिसूचनेमध्ये दिलेला आहे.
अर्जाचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या ई-मेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे.

ई-मेल ॲड्रेस – kidclegal@gmail.com

वकील पदासाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२४ ही आहे.
उमेदवारांनी अंतिम तारखेआधी नोकरीचा अर्ज भरावा.

वरील नोकरीसंदर्भात इच्छुक उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास पाटबंधारे विकास मंडळ, ठाणेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दयावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचनेची लिंक वर नमूद केलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patbandhare vibhag recruitment 2024 konkan irrigation development corporation thane is hiring for advocate position dha