सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणाऱ आहे. यामध्ये “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, ईएनटी तज्ज्ञ अशा विविध पदांच्या एकूण ६५ रिक्त जागांची भरती होणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेद्वारांकरिता मुलाखती आठवडयातील दर बुधवारी सकाळी-११.०० वाजता मुलाखती अयोजित करण्यात येत आहेत.
PCMC Vacancy 2024 : पदाचे तपशील-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ज्ञ या पदांसाठी भरती आयोजित केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत एकूण ६५ जागांसाठी भरती होणार आहे.
पदाचे नाव – पद संख्या
फिजिशियन – ०९
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ -०९
बालरोग तज्ज्ञ – ०९
नेत्ररोग तज्ज्ञ -०९
त्वचारोग तज्ञ -०९
मानसोपचार तज्ज्ञ – १०
ईएनटी तज्ज्ञ -१०
PCMC Vacancy 2024 : शैक्षणिक पात्रता
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रता असावी.
पदाचे नाव -शैक्षणिक पात्रता
फिजिशियन- एमडी मेडिसिन/ डीएनबी
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ – एमडी/एमएस स्त्रीरोगतज्ज्ञ/डीजीओ/ डीएनबी
बालरोगतज्ज्ञ – एमडी पीईडीएसs/ डीसीएच/डीएनबी
नेत्रचिकित्सक – एमएस नेत्रतज्ज्ञ/डीओएमएस
त्वचारोग तज्ञ – एमडी (त्वचा/व्हिडी), डीव्हिडी, डीएनबी
मानसोपचारतज्ज्ञ -एमडी मानसोपचार/डीपीएम/डीएनबी
ईएनटी विशेषज्ज्ञ- एमएस ईनटी / डीओआरएल/ डीएनबी
PCMC Vacancy 2024 :वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ७० वर्षे आहे.
हेही वाचा – पुण्यातील NDAमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या शेवटची तारीख
PCMC Vacancy 2024 : निवड प्रक्रिया
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत भरती केल्या जाणाऱ्या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारावर केली जाईल.
PCMC Vacancy 2024 : मुलाखतीचा पत्ता
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८
मुलाखतीची तारीख आणि वेळ
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती आठवडयातील दर बुधवारी सकाळी-११.०० वाजता मुलाखती अयोजित करण्यात येत आहेत.
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
अधिसुचना – https://drive.google.com/file/d/1MiI1ztG2hCnoRhaqCd_ksdpcf5_bh8gj/view
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिरातीमध्ये दिलेल्या वेळेत आणि पत्यावर हजर राहावे.