PDEA Bharti 2024: पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. यामध्ये एकूण १७ विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. नोकरी पुणे शहरात उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी ८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत यासाठी अर्ज करावा. किती आणि कोणती पदे रिक्त आहेत ते पाहा. तसेच, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कुठे करावा ते जाणून घ्या.
PDEA Bharti 2024: पदांची नावे आणि रिक्त जागा
रजिस्ट्रार – १ जागा
कायदा अधिकारी – १ जागा
प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी – १ जागा
प्रशासक/ सहाय्यक प्रशासक २ जागा
कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क इंजिनिअर -२ जागा
डिजिटल स्टुडिओ ऑपरेटर आणि एडिटर [संपादक] – १ जागा
सहायक लघुलेखक [Assistant Stenographer] – १ जागा
लेखा लिपिक [ Accounting Clerk] -४ जागा
लिपिक [Clerk] – ४ जागा
PDEA Bharti 2024 अर्ज करण्याची थेट लिंक
http://pdeapune.org/#
PDEA Bharti 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1ZqPLKG1aVClDFf9hu704JvlAgkZvp7M6/view
PDEA Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
- रजिस्ट्रार – कोणत्याही क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाची सेकंड क्लास किंवा त्यावरील गुणांची पदवी असावी. तसेच शिक्षण क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव असावा.
- कायदा अधिकारी – एलएलबी/एलएलएमसह शिक्षण क्षेत्रात किमान पाच वर्षांचा न्यायालयीन अनुभव असणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी – बी.इ कॉम्प्युटर/ एम.एस.सी. / एम. सी. ए. [फर्स्ट क्लास]/ इ. आर. पी. / टॅली/ डेटा बेस मॅनेजमेन्ट/ डेटा अनॅलिसिस आणि
क्लाउड कॉम्प्युटिंग या शिक्षणासह शैक्षणिक क्षेत्रात किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. - कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क इंजिनिअर – बी.सी. ए./ बी.सी. एस. [सेकंड क्लास व अधिक] क्षेत्रात शिक्षण आवश्यक. तसेच कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग यात सर्टिफिकेट कोर्स आणि एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच सीसीएनए प्रमाणपत्रास अधिक महत्त्व दिले जाईल.
- डिजिटल स्टुडिओ ऑपरेटर आणि एडिटर [संपादक] – पदवी किंवा डिप्लोमा (सेकंड क्लास व अधिक); ऑडिओ/व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि एडिटिंग संबंधित क्षेत्रात किमान वर्षाचा अनुभव असावा.
- सहायक लघुलेखक [Assistant Stenographer] – इंग्रजी/मराठी माध्यमातील पदवी शिक्षण आवश्यक. टायपिंगमध्ये प्रति मिनिटे मराठी/इंग्रजी भाषेत १०० शब्दांचा असा शॉर्ट हॅन्ड वेग असणे गरजेचे. शैक्षणिक क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
- लेखा लिपिक [ Accounting Clerk] – बी.कॉम/एम.कॉम क्षेत्रात [सेकंड क्लास व अधिक] पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण असावे. टॅली ईआरपी-९, टॅली प्राइम, सिस्टम ऑडिटिंग, कॉम्प्युटर विषयातील ज्ञान असावे. शैक्षणिक क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
- लिपिक [Clerk] – कोणत्याही क्षेत्रातील [सेकंड क्लास व अधिक] पदवी असणे गरजेचे आहे. ईआरपी आणि टॅली ईआरपी-९ अशा अकौंटिंग सॉफ्टवेअरचे ज्ञान असावे. मराठी/इंग्रजी भाषेत टायपिंगसह, शैक्षणिक क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
PDEA Bharti 2024: अर्ज कसा आणि कुठे करावा
इच्छुक उमेदवारांना हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहिल्यास, अर्धवट भरल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे उमेदवाराने जोडणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. अंतिम तारखेआधी अर्ज भरावा.
अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
उमेदवारास अजून माहिती हवी असल्यास वर दिलेली अधिसूचना वाचावी.