Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2024 : नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानतर्फे विविध पदांच्या ११ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पात काम करणाची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. पशुवैद्यकीय अधिकारी, कायदा अधिकारी, MSTrIPES व्यवस्थापक, चाराकटर, महावत अशा पाच जागांसाठी ही मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख, मुलाखतीचा पत्ता, शैक्षणित पात्रता आणि याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदे आणि पदसंख्या – पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानतर्फे खालील जागांसाठी एकूण ११ रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

  • पशुवैद्यकीय अधिकारी – १
  • कायदा अधिकारी – १
  • MSTrIPES व्यवस्थापक – १
  • चाराकटर – ४
  • महावत – ४

शैक्षणिक पात्रता – वेगवेगळ्या पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता विभागली आहे.

  • पशुवैद्यकीय अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.
  • कायदा अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी अॅडव्होकेट्स अॅक्टनुसार राज्य बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी केलेली पाहिजे. शैक्षणिक अर्हता व अनुभव
  • MSTrIPES व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एमएससीआयटी उत्तीर्ण, टंकलेखन गती- 40 शप्रमी (इंग्रजी) 30 शप्रमी मराठी / हिंदी (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
  • चाराकटर – किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.
  • महावत – किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.

हेही वाचा : NMC Nagpur Recruitment 2024 : नागपूर महानगरपालिकेत ‘या’ रिक्त पदाकरिता थेट मुलाखत, जाणून घ्या मुलाखतीची तारीख

पगार –

  • पशुवैद्यकीय अधिकारी – ५०,०००
  • कायदा अधिकारी – ५०,०००
  • MSTrIPES व्यवस्थापक – २०,०००
  • चाराकटर – १५,०००
  • महावत – २५,०००

मुलाखतीची तारीख – २६ फेब्रुवारी २०२४

मुलाखतीचा पत्ता – वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर यांचे कार्यालय, 1 ला माळा, नविन प्रशासकीय इमारत “वनभवन”, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ, नागपूर- ४४०००१

नोकरीचे ठिकाण – नागपूर</p>

अधिकृत वेबसाइट – https://mahaforest.gov.in/

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी २६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. मुलाखतीला येताना आवश्यक कागदपत्रे बरोबर घेऊन यावी. पात्र उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pench tiger reserve nagpur bharti 2024 recruitment of 11 vacancies know interview date place and salary ndj