डॉ श्रीराम गीत

करिअर आणि आवड याची प्रत्येकालाच सांगड घालता येते असे नाही. म्हणूनच ही मयूरीची गोष्ट तिच्या प्राणिप्रेमासारखीच आपलीही आवडती होऊन जाते. आयटीत चांगल्या पगाराची नोकरी असल्यामुळे तिला नोकरी करता करता आवड जोपासणं शक्य झालं आणि तिची ‘शेल्टरवाली ताई’ अशी ओळख निर्माण झाली…

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

खराडीचं माझं ऑफिस संपवून मी परत येत होते. कॅबमध्ये सगळ्यांना उतरवल्यानंतर मी एकटीच राहिली होते. वारज्याचा माझा फ्लॅट यायला अजून खूप अवकाश होता. तेवढ्यात माझ्या पर्समधला मोबाइल वाजला. ‘‘शेल्टरवाल्या ताई बोलतात का? एक कुत्रं स्कूटरखाली येऊन जखमी झालं आहे. आम्ही त्याला फुटपाथवर उचलून ठेवलं आहे. पण ते कोणाला हात लावू देत नाहीये. त्याची तुम्ही काही व्यवस्था कराल का? ‘‘ मी त्याला लोकेशन पाठवायला सांगितले आणि आमच्या शेल्टर संस्थेतील कार्यकर्त्याला तिथे पोहोचायला सांगितले. वारज्याला माझ्या घरापासून शेल्टरची जागा जेमतेम दहा मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी तिथे पोहोचेपर्यंत जखमी कुत्रा घेऊन कार्यकर्ता पोहोचला होता. प्राथमिक निरीक्षण केल्यावर असे लक्षात आले की कुठेही त्याचे हाड मोडलेले नाही. मात्र धक्का लागून अंतर्गत कुठे जखमा झाल्या आहेत काय हे बघण्याकरिता व्हेटला मी फोन करून ठेवला. आमच्या शेल्टर संस्थेत काम करणारे सर्व विविध प्रकारच्या प्राण्यांवर अतिशय प्रेम करणारी आहेत. दोघं सोडली तर इतर मंडळी नोकऱ्या करून हौसेखातर हे काम करतात. मात्र कोणत्याही प्राण्याशी आमचा कार्यकर्ता जेव्हा संवाद साधतो तेव्हा तो प्राणी त्याच्या हुंकारातून प्रतिसाद देतो हे मात्र नक्की. खरं नाही ना वाटत तुम्हाला? पण हे जगच तसे वेगळे आहे.

हेही वाचा >>> MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क आणि संसाधन : अद्यायावत मुद्दे

उपजत प्राणिप्रेम

माझी आयटीमध्ये उत्तम नोकरी असली, भरपूर पगार असला तरी शेल्टरचा खर्च भागवण्याकरिता कायमच आम्हाला हात पसरावा लागतो. शेल्टरच्या कामामुळे मला दोन मोबाइल ठेवायला लागतात. वैयक्तिक कामाचा एक, शेल्टरचे कॉलसाठी दुसरा. माझ्या उद्याोगाला वडिलांचे पाठबळ असले तरी आर्थिक मदतीची त्यांची शक्यता नाही. मुळात ते भोरजवळच्या एका गावातील छोटे शेतकरी. मात्र शेतावर दोन आणि घरी एक अशी कुत्री कायमच मी लहानपणापासून पाहत आलेली. पूर्वी बैलजोडी होती, पण आता फक्त दोन गाई आणि एक म्हैस राहिली आहे. आमच्याकडे नसल्या तरीसुद्धा कोंबड्या, बकऱ्या, कबुतरे, पारवे आणि सगळ्या घरातून हिंडणाऱ्या मांजरांच्या सोबतीतच मी वाढले. शेतावरच्या आमच्या विहिरीमध्ये दोन मोठी कासवे होती. कासवे विहिरीचे पाणी स्वच्छ ठेवतात असे वडिलांनी मला लहानपणी सांगितले होते. भोरमध्येच सायन्स शाखेत बारावी शिकल्यावर पुण्याच्या एका कॉलेजच्या होस्टेलला माझी रवानगी झाली. खरे तर मला व्हेटर्नरी डॉक्टर बनायचे होते पण त्याचे मार्क कमी पडले. पुण्याच्या सीमेवर असलेल्या कात्रजमध्ये एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये माझा प्रवेश झाला आणि मी हॉस्टेलला मुक्काम टाकला. आमचं हॉस्टेल तसे डोंगराच्या काठाला.

जोपासलेले प्राणिप्रेम

पावसाळ्यात डोंगरात विविध वन्य प्राणीही पाहायला मिळत. साप, बेडूक, उंदीर हे तर नित्याचेच. पण एके दिवशी मेसमधून परत येताना तुरुतुरु चालणारे कासवाचे छोटे पिल्लू मला समोर दिसले. वाट चुकलेले ते पिल्लू मी उचलून घेतले आणि रूमवर घेऊन आले. त्याला एका मोठ्या प्लास्टिकच्या डब्यात झाकणाला दोन-तीन भोके पाडून ठेवले होते. माझी रूम पार्टनर जेव्हा खोलीत नसेल तेव्हा मी त्याला जरा मोकळे सोडत होते. अचानक एके दिवशी पार्टनर काहीतरी विसरले म्हणून खोलीवर परत आली. त्या कासवाशी गप्पा मारत मी खेळताना पाहून तिने किंचाळीच फोडली. तिची किंचाळी ऐकून आसपासच्या खोल्यांतील मुली धावत आल्या आणि माझे कासव पाळण्याचे गुपित सगळ्यांना कळले. संध्याकाळपर्यंत माझ्या लाडक्या कासवासकट मला रेक्टरसमोर उभे राहावे लागले. रेक्टरने फक्त एकच वाक्य सांगितले ह्यकासवासकट जायचे तर घरी जा, नाहीतर कासव रखवालदाराच्या हाती सोपव.’ रडत रडत त्या छोट्या पिल्लाला रखवालदाराकडे सोपवून मी रूमवर परतले. त्या दिवशी जेवण तर सोडाच रात्री झोपपण आली नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजकडे जाताना तोच रखवालदार दिसला आणि त्याने मला हाक मारली. ताई तुमचे कासव पिल्लू सुखरूप आहे. माझ्या मुलीला ते खूप आवडले आणि त्याला आम्ही घरात ठेवले आहे. त्या दिवसापासून माझ्या मनात शहरी माणसे प्राण्यांशी अशी दुष्टपणे का वागतात हा प्रश्न उभा ठाकला.

समविचारी मंडळींची साखळी

काही दिवसांतच मी मनाशी पक्के ठरवले की अशा अनाथ बेवारस, जखमी प्राण्यांची देखभाल करणारी माझ्या ताकदीवर चालेल अशी व्यवस्था उभी करायची. माझ्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आठवडाभरातच जवळपास विविध अनाथ व जखमी प्राण्यांचे फोटो झळकू लागले. गोंडस मांजराचे पिल्लू, बोलक्या डोळ्याचे मोठे लंगडणारे जखमी कुत्रे, पोपट, हॉस्टेलमागे डोंगरावर क्वचित दिसणारे मोर आणि त्याच्या जोडीला प्रत्येक फोटोखाली माझे छोटे निरीक्षण किंवा विनंती. माझे लाइक्स वाढू लागले पण समविचारी मंडळींची एक साखळी हळूहळू तयार होत होती याची मला त्या वेळी कल्पना आली नाही. पण जेव्हा शेल्टर नावाची स्वयंसेवी संस्था सुरू झाली तेव्हा हीच साखळी मदतीसाठी उपयोगी पडली. माझा हा उद्याोग आईला कधीच आवडला नव्हता. पास हो लग्न कर, जमलं तर अमेरिकेला निघून जा. वडिलांच्या शेतीच्या रामरगाड्यातून कायमची बाहेर पड, हे ती मला पुण्याला गेल्यापासून सतत बजावत असे. मात्र तिची लाडकी मयूरी भलतीकडेच भरकटत आहे म्हणून ती खूप अस्वस्थ होई. वडिलांना शेतकामातून वेळ मिळे तेव्हा माझे हे फोटोचे कौतुक जरूर पाहात. फोनवर कौतुकपण करत.

नोकरीतून शेल्टरची उभारणी

मी इंजिनीअर झाले. खराडीला नोकरीला लागले आणि माझे हॉस्टेल सुटले. उत्तम पॅकेज मिळाल्यामुळे घरून पैसे मागवण्याची वेळ थांबली. माझ्याच कंपनीत एक प्राणिप्रेमी सहकारी भेटल्यामुळे वर्षभरातच शेल्टरची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. आमच्याच आयटी कंपनीला शेल्टरवरचे आमचे प्रेझेंटेशन दाखवल्यानंतर पुढील पाच वर्षांकरिता सीएसआरमधून पैसेही उपलब्ध झाले. एक मोठा मोकळा प्लॉट त्यातून लीजवर भाड्याने घेऊन आमचे काम सुरू झाले.

टीका आणि कौतुक

काही वेळा आमच्या कामावर खूप टीका होते. शेल्टरजवळची मंडळी काही वेळा प्राण्यांच्या ओरडण्याच्या त्रासाने तक्रारी करतात. आमच्या एकाही प्राण्याने तुम्हाला कधी त्रास दिला आहे का? चावली आहेत का? यावर त्यांचे कडे उत्तर नसते. हीसुद्धा आम्हाला एक प्रकारची पोचपावतीच आहे. विविध महागडी कुत्री, मांजरे विकत घेऊन त्यांच्यावर खर्च करण्यापेक्षा आमच्याकडचे बरे झालेले अनाथ प्राणी दत्तक घेऊन प्रेमाने वाढवणारी पुणेकर मंडळी वाढत आहेत. एका प्राणिप्रेमी यू-ट्यूबर व इन्फ्लुएन्सरने शेल्टरवर एक कार्यक्रम केला आणि पाहता पाहता आमचे काम वाढले. मालकाने सांभाळता येत नाही म्हणून सोडून दिलेले पाळीव प्राणी सैरभैर होतात. प्राण्यांची आई हरवल्यामुळे पिल्ले भरकटतात. वेगवान वाहनांमुळे जखमी होतात. अशांना तात्पुरता निवारा देऊन आम्ही योग्य कुटुंबात त्यांचे दत्तक देऊन पुनर्वसन करतो. शेतावरील वातावरण वारज्याच्या आमच्या शेल्टरमध्ये अनुभवल्याने मी घरापासून एकटी पडली आहे असे कधीच जाणवत नाही. चांगल्या कामाला पैसे कधीच कमी पडत नाहीत हे आम्ही अनुभवत आहोत. मागच्या महिन्यात आईने शेल्टरवर मला न सांगता तासभर वेळ घालवला हे जेव्हा मला कळले तेव्हा माझ्या कामाचे खरे सार्थक झाले. (क्रमश:)

Story img Loader