PMC Recruitment 2023: पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे महापालिकेने क्लर्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भकरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महापालिकेने जाहीर केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शवेटची तारीख आणि शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे महानगरपालिका भरती २०२३ –

पदाचे नाव – क्लर्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर.

एकूण रिक्त पदे – ६

शैक्षणिक पात्रता –

विज्ञान शाखेतील पदवी + इंग्लिश टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.

हेही वाचा- भारतीय रिझर्व बँकेत नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदासांठी भरती सुरु, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता निकष

वयोमर्यादा – अद्याप माहिती उपलब्ध नाही.

अर्ज शुल्क – कसलेही अर्ज शुल्क नाही.

नोकरी ठिकाण – पुणे</p>

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरवात – २६ जून २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जून २०२३

अर्ज सादर करण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ पुणे.

महत्वाचे संकेतस्थळ –

जाहिरात – भरतीसंबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1iTQM9pciD3Dq5vdRAAuWWD6HF6thHFf9/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/mr?main=marathi

उमेदवारांना सूचना – या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc bharati 2023 pune municipal corporation recruitment for clerk cum data entry operator posts jap