PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेत नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महापालिके (PMC) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदांसाठी २८८ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे. पुणे महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे महानगरपालिका भरती २०२३ –

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष).

शैक्षणिक पात्रता –

  • वैद्यकीय अधिकारी : MBBS + MCI/ MMC नोंदणी.
  • स्टाफ नर्स : GNM/ B.Sc नर्सिंग + MNC नोंदणी
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) : विज्ञान विषयात १२ वी पास + पॅरामेडिकल ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स.

अर्ज फी – अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.

हेही वाचा – पदवीधर आणि डिप्लोमा उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! CNP नाशिक येथे विविध पदांसाठी भरती सुरु

नोकरीचे ठिकाण – पुणे.

अर्ज करण्याचा पत्ता –

इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं. ७७०/३, बकरे अव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – ४११००५.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरवात – १८ ऑक्टोबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/mr?main=marathi

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/11XMkgdaRQTz20d2qCivhYZYrRzFCMhCy/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc opportunity for a job in pune municipal corporation recruitment for 288 posts of these posts know who can apply jap