डॉ. श्रीराम गीत

जवळच्या मित्रांच्या गप्पांमध्ये मुलं कसं ऐकत नाहीत याच्या चर्चा नेहमीच होत होत्या. याचा माझ्याशी काय संबंध अशा पद्धतीत त्या चर्चा मी ऐकत आलो होतो. माझा कुणाल अभ्यासात फारसा चांगला नाही याची जाणीव तो पाचवीमध्ये हायस्कूलला गेल्यापासून झाली होती. त्यावरचा उपाय काय हे सुद्धा लक्षात घेऊन येत्या सात-आठ वर्षात त्यासाठीची आर्थिक तरतूद करायला मी कधीच सुरुवात केली होती.

heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

माझ्या माहितीत असलेली अनेक अत्यंत सामान्य मुले इंजिनीअर होऊन नंतर अमेरिकेमध्ये सेटल झालेली नावानिशी मला माहिती असल्यामुळे कुणालचे पुढे काय? हा प्रश्न मनात कधीच येत नव्हता. या बाबतीत माझे आई-बाबा आणि सुप्रिया यांचे मत मात्र वेगळेच होते. घरात होणारे सारखे वाद टाळण्यासाठी त्यात मी पडत नसे. कुणालने उत्तम मार्क मिळवावेत, खूप अभ्यास करावा, शास्त्र गणित चांगले असावे, मुख्य म्हणजे त्याने मोठ्यानी सांगितलेल्या गोष्टी नीट ऐकाव्यात, उद्धटपणे उत्तरे देऊ नयेत यावर त्या तिघांचा कायम भर असे. कामानिमित्त सकाळी सातला घर सोडल्यावर अन् रात्री आठला परत आल्यानंतर यावर वादावादी करण्याची माझी ताकद शिल्लक राहत नसे.

भरकटणे हे नवीन नाही

एकेका ऐकलेल्या विषयात मुले भरकटतात आणि त्याचा ध्यास घेऊन दोन-तीन वर्ष ते वेड धरून बसतात, अशी माझ्या माहितीत अनेक उदाहरणे असल्यामुळे या साऱ्याकडे थोडेसे माझे दुर्लक्षच झाले. मला गेमिंगमध्येच करिअर करायची आहे, मला गेमर बनायचं आहे, हे सतत गेम्स खेळणारा कुणाल अशाच प्रकटलेल्या वेडा पायी म्हणत असेल अशी माझी कल्पना होती. तिला जबरदस्त धक्का कुणालने आठवीचा निकाल लागला त्या दिवशी दिला आणि मला अवाक् करून सोडले. माझा अनावर झालेला राग आईने आवरला नसता तर कुणालने त्या दिवशी खूप मार खाल्ला असता.

हेही वाचा >>> नोकरीची संधी

असे प्रसंग घरात होऊ नयेत याची काळजी आता मला घेतलीच पाहिजे. म्हणून मी माझ्या मित्रांकडे गेमिंगबद्दलची चौकशी करायला सुरुवात केली. एकाही मित्राला त्या इंडस्ट्रीबद्दल काही सुद्धा माहिती नव्हती. मुलांसाठीचे गेम्स विकत घेणे या पलीकडे त्यांचा त्याच्याशी कधीच संबंध आला नव्हता. अशा इंडस्ट्रीत काम करणारी व्यक्ती सापडणे तर फारच दूरचे. या क्षेत्रात करिअर करायची म्हणजे काय करावे लागते याची माहिती कशी मिळणार? कोण सांगणार?

एखाद्या अंधाऱ्या गल्लीमध्ये पायी चालत असताना अचानकपणे सारे दिवे जावेत आणि गल्लीचे पुढचे टोक सुद्धा दिसू नये, अशा वेळी जसा पोटात गोळा येतो, अंगावर शहारा येतो, तशी माझी अवस्था अलीकडे रोज होत होती. माझ्या नोकरीतील अस्थिरता, वयाच्या ५५ व्या वर्षीच दिसू लागलेली रिटायरमेंटची वेळ आणि कुणालचे अपुरे शिक्षण, अपुरा पगार, कुठेच न जाणारी करिअर अशा साऱ्या चक्रव्यूहात तब्बल तीन ते चार वर्षे भोवंडत गेली. घरात बायकोशी, सुप्रियाकडे हा विषय काढणेही अशक्य. तिची शाळा, मुले आणि संसार यातच ती गुरफटलेली असताना हा मलाही न उलगडलेला विषय तिला कसा बरे कळणार?

हेही वाचा >>> UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सीरिज- ३९

कुणालचा उर्मटपणा खूप वाढत चालला आहे. पण त्यावर कोणताच उपाय नाही हे गेले तीन वर्षे सतत मला जाणवत होते. मुलाची आर्थिक भरपट होऊ नये म्हणून महिन्याला काही रक्कम मी त्याच्या बँकेच्या खात्यात भरायला सुरुवात केली. आई-वडिलांकडे पैसे मागायला कशी लाज वाटते ते मला माहिती होते. पण कुणालने एका शब्दानेही त्याबद्दल माझ्याकडे उल्लेख सुद्धा केला नाही. आभार मानणे तर फारच लांबचे. दहावी पास झाल्यानंतर त्याने कॉमर्सला प्रवेश घेतला पण वर्षभरातच नापास झाल्याचा धक्का साऱ्या घराला दिला. पण तो धक्का कुणालला बसलाच नाही. गेमर बनायला पदवीची गरज नसते, हे त्याचे वाक्य आमच्या शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या घराला अक्षरशा काळजात सुरी खुपसावे तसे वाटले होते. नंतरचे सारेच दिवस एखाद्या दीर्घ आजारातून उठल्यासारखे होते. सुप्रियाला आणि मला मानसिक थकव्याने घेरलेले होते. कुणाल या शब्दापासून सुरू होणारा कोणताही विषय काढून आई बाबांशी घरात संवाद संपल्यात जमा होता. सहजगत्या सगळेजण कधी बाहेर गेलो आहोत हेही आता आठवेनासे झाले होते. कंपनीच्या पार्ट्या टाळण्याकडे माझं कल सुरू झाला होता ,कारण तिथे तुमचा मुलगा काय करतो या वरच्या चर्चेतूनच गप्पांना सुरुवात होत असे.

पालकत्वाच्या चर्चा किती निरर्थक असतात आणि मुलांसाठी खायच्या खस्ता किंवा त्यांच्यासाठी करावयाची आर्थिक तरतूद असे वृत्तपत्रातील विषय वाचून डोके उठायला लागले होते. मात्र, अचानक अंधाऱ्या गल्लीच्या टोकाला उजेडाची तिरीप दिसली ती म्हणजे कुणालने दिलेली नोकरीची बातमी. पुढे काय याबद्दल अजूनही माझ्या मनात खूप सारे प्रश्न दाटले आहेत पण निदान आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे हे मात्र नक्की.