पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे शिकाऊ पदांसाठीच्या १०३५ जागांसाठीची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी कोण अर्ज करु शकतं? भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकूण रिक्त पदे – १०३५

पदानुसार रिक्त पदे –

पदाचे नावशाखा रिक्तपदे
ITI अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)१६१
सेक्रेटरिअल असिस्टंट
डिप्लोमा अप्रेंटिस३३५
ट्रेड अप्रेंटिसपदवीधर अप्रेंटिस४०९
HR एक्झिक्युटिव९४
CSR एक्झिक्युटिव१०
एक्झिक्युटिव (लॉ)
PR असिस्टंट१०

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२३ –

हेही वाचा- उत्तर रेल्वेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु; मुलाखतीची तारीख जाणून घ्या

शैक्षणिक पात्रता –

ITI अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल विषयात ITI.

सेक्रेटरिअल असिस्टंट – १० वी पास + स्टेनोग्राफी/ सचिवीय/ व्यावसायिक सराव आणि/ किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान.

डिप्लोमा अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल/ सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पदवीधर अप्रेंटिस – व्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT विषयात इंजिनिअरिंग पदवी/ B.Sc.(Engg.)

HR एक्झिक्युटिव – MBA (HR)/ MSW/ पर्सोनेल मॅनेजमेंट/ कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध PG डिप्लोमा.

CSR एक्झिक्युटिव – MSW/ ग्रामीण विकास/ व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी.

एक्झिक्युटिव (लॉ) – पदवीधर + LLB.

PR असिस्टंट – मास कम्युनिकेशन (BMC)/ जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन (BJMC) पदवी/ B.A. (जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन)

वयोमर्यादा – सर्व प्रवर्गासाठी १८ वर्षे.

अर्ज फी – कोणतीही अर्ज फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १ जुलै २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२३

अधिकृत बेवसाईट – https://www.powergrid.in/

भरतीसंदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://www.powergrid.in/rolling-advertisement-for-enagagement-of-apprentices) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Powergrid bharati 2023 power grid corporation of india recruitment for 1035 posts apply today jap
Show comments