MPSC PSI Bharti 2023: स्पर्धा परीक्षेतून PSI होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीद्वारे एकूण ६१५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. विशेष म्हणजे ही भरती विभागीय असून पोलीस खात्यातील कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच या भरतीसाठी उमेदवारांना MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ द्यावी लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, परीक्षेची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, पगार आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा