महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी गट-अ’ पदांच्या एकूण १७२९ रिक्त जागांसाठी मेगा भरती उद्यापासून सुरू होणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होईल. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ असणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, पदसंख्या, अर्ज शुल्क यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Arogya Vibhag Bharti 2024 : पदाचे नाव – ‘वैद्यकीय अधिकारी गट-अ’

Arogya Vibhag Bharti 2024 : पदसंख्या – १७२९ जागा

Arogya Vibhag Bharti 2024 : अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Bharti 2024: शैक्षणिक पात्रता –

‘वैद्यकीय अधिकारी गट अ’साठी उमेदवार एम.बी.बी.एस. किंवा बी.ए.एम.एस. हे शिक्षण घेतलेले असावे.

हेही वाचा…Home Guard Bharti 2024: १२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! ‘होम गार्ड’ पदासाठी मेगाभरती सुरू

Arogya Vibhag Bharti 2024 : पगार

‘वैद्यकीय अधिकारी गट-अ’साठी वेतनशुल्क १७,७५० ते ५६,१०० पर्यंत असणार आहे.

Arogya Vibhag Bharti 2024 : अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत. अर्ज दिलेल्या लिंकवरून सादर करावा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public health department of maharashtra state has invited application for the posts of medical officer group a asp
Show comments