पुणे महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजेपयी वैद्यकीय महाविद्यालयातील उर्वरित पदे भरण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता महाविद्यालयातील १०१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरतीअंतर्गत विविध विभागाचे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक अशा २४ जागा, सहाय्यक प्राध्यापकांच्या २६ जागांसह प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल व अन्य शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण १०१ जागी भरण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ४२८ पदासांसाठी भरती सुरु, लवकर अर्ज करा

महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सध्या पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून प्रथमवर्गात सध्या २०० विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आवश्यक असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीबाबत, पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टने मान्यता दिली होती. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम तयार करून तो राज्याच्या नगर विकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्याला आता महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे.

हेही वाचा- १० वी पास ते पदवीधारकांना महिला व बाल विकास विभागात नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

महाराष्ट्र शासनाने या पदभरतीला हिरवा कंदील दाखवल्यामुळे महापालिकेतील विविध पदभरतीची जाहिरात लवकरच काढण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांना आता महापालिकेत काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सदर पदभरतीमध्ये विविध विभागाचे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक अशा २४ जागा, सहाय्यक प्राध्यापकांच्या २६ जागांसह प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल व अन्य शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण १०१ जणांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठीची जाहिरात पुणे महापालिकेकडून लवकरच काढण्यात येणार असून या भरतीबाबतच्या अधिकच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही महापालिकेच्या अधिकृत बेवसाईटला भेट देऊ शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mahanagarpalika bharti 2023 approval to fill 101 posts in medical college of pune municipal corporation jap
Show comments