PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे महापालिकेतील विविध विभागांत ६८२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी लगेच अर्ज करावा लागणार आहे. कारण १९ ऑगस्टपर्यंतच मुदत दिली गेली आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पद, वेतन, श्रेणी, वयोमर्यादा, शिक्षण तसेच अर्ज कसा भरायचा ही सगळी माहिती जाणून घेऊयात.
PMC Recruitment 2024: विभाग – ही भरती पुणे महानगरपालिका मध्ये होत आहे.
PMC Recruitment 2024: भरतीची श्रेणी – ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
PMC Recruitment 2024: नोकरीचे ठिकाण – लनियुक्त उमेदवाराला पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
PMC Recruitment 2024: पदाचे नाव – या भरतीद्वारे विविध युवा प्रशिक्षण पदे भरण्यात येणार आहे.
PMC Recruitment 2024: एकूण पदे – एकूण ६८२ पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी १२वी/ ITI/ उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
PMC Recruitment 2024: वयोमार्यादा – ज्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षापर्यंत आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
PMC Recruitment 2024: वेतन – वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
PMC Recruitment 2024: अर्ज पद्धत – उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
PMC Recruitment 2024: अर्ज शुल्क – या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
How to Apply: अशा पद्धतीने अर्ज करा
१. अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे, जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
२. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज सबमिट करा.
हेही वाचा >> IOCL Recruitment 2024: खूशखबर! इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज
PMC Recruitment 2024: आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
पासपोर्ट फोटो
रहिवासी दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अधिसूचना –
अधिक माहितीसाठी ही अधिसूचना पाहा आणि लवकरात लवकर अर्ज करा,
© IE Online Media Services (P) Ltd