Punjab National Bank recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँकेमध्ये ७ फेब्रुवारी २०२४ पासून स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी भरती सुरू होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पंजाब नॅशनल बँकेच्या pnbindia.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या पदांकरिता एकूण १०२५ जागांवर भरती सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची तारीख ७ ते २५ फेब्रुवारी अशी आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जासाठी पात्रता निकष काय आहेत ते पाहा.
Punjab National Bank recruitment 2024 : रिक्त पदे
अधिकारी – क्रेडिट – एकूण रिक्त पदांची संख्या १०००
व्यवस्थापक – फॉरेक्स – एकूण रिक्त पदांची संख्या १५
व्यवस्थापक – सायबर सुरक्षा – एकूण रिक्त पदे ५
वरिष्ठ व्यवस्थापक – सायबर सुरक्षा – एकूण रिक्त पदे ५
Punjab National Bank recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.pnbindia.in/Recruitments.aspx
Punjab National Bank recruitment 2024 : निवड प्रक्रिया
या पदांवर उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाइन लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल किंवा केवळ वैयक्तिक मुलाखतीवर उमेदवाराची निवड केली जाऊ शकते. ही प्रक्रिया प्रत्येक जागेवर येणाऱ्या अर्जांवर अवलंबून राहील. ऑनलाइन लेखी परीक्षा घेतल्यास ती एकूण १०० मार्कांची असेल; तर वैयक्तिक मुलाखत ही ५० मार्कांची असेल.
Punjab National Bank recruitment 2024 : अर्ज करण्यासाठी शुल्क
एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी [SC/ST/PwBD] या श्रेणीतील उमेदवारांना ५० रुपये + GST १८% = ५९ रुपये, असे शुल्क भरावे लागेल.
इतर श्रेणींतील उमेदवारांना १००० रुपये + GST १८% = ११८० रुपये इतके शुल्क भरावे लागेल.
अर्ज शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस किंवा कोणतेही यूपीआय यांसारख्या गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो.
उमेदवारांना नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करण्याबाबत अधिक माहितीसाठी हवी असल्यास पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे अथवा वर दिलेली अधिसूचना वाचावी.