उमेदवाराचं नाव, आडनाव, जन्मठिकाण ही माहिती डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये सुरुवातीलाच येते. त्यानुसार प्रश्न येऊ शकतात. जन्म ठिकाण पुणे असेल तर काय प्रश्न येऊ शकतात हे आपण पाहिलं. समजा मुंबई जन्मस्थान आहे तर काय प्रश्न येऊ शकतात हे पाहूया.
१. महाराष्ट्र राज्याला मुंबई आणि नागपूर या २ राजधान्या कशा?
१. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी का मानली जाते?
२. मुंबईत दहशतवादी हल्ले, बॉम्बहल्ले का होतात?
३. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या पोलीस प्रशासनात आणि मुंबईत काय बदल झाले? अशा प्रकारचा हल्ला पुन्हा झाला तर त्याचा सामना करण्याची प्रशासनाची/पोलिसांची तयारी आहे का?
४. मुंबई आणि दिल्ली शहरांमध्ये/शहरांच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो?
५. मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी काय करता येईल?
६. पावसाळ्यात मुंबईत पाणी साठण्याचे प्रकार खूप होतात, यावर उपाय काय?
७. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नावर उपाय काय? धारावीच्या विकासासंदर्भात तुम्हाला काय माहिती आहे?
८. देशातल्या इतर राज्यातून मुंबईत होणाऱ्या स्थलांतरावर उपाय काय?
९. मुंबईतल्या कापड गिरण्या का बंद पडल्या?
१०. बॉम्बे हाय बद्दल तुम्हाला काय माहिती आहे?
११. मुंबई शहरातील 3 UNESCO world heritage sites कोणत्या त्यापैकी एक एलिफन्टा लेणी कोणत्या काळातील आहेत? त्यांच्या संरक्षणासाठी काय उपाय करता येतील?
१२. मुंबईमध्ये समुद्रकिनारे आहेत त्यांचा पर्यटन वाढवण्यासाठी कसा उपयोग करता येईल?
१३. मुंबईतील बॉलिवूडची हॉलीवूड, टॉलीवूड, मॉलिवूड, कॉलिवूडशी तुलना करा
१४. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनविषयी काय माहिती आहे?
१५. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गामुळे विदर्भाच्या विकासात हातभार लागणार का?
१६. मुंबई आणि दिल्ली शहरांतील सांस्कृतिक फरक
उमेदवाराच्या अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये एकापेक्षा जास्त शहरांचा संदर्भ आलेला असतो. फॉर्ममध्ये उमेदवाराचे जन्मठिकाण लिहायचे असते तसेच आई वडिलांचे जन्म ठिकाणही लिहायचे असते. काही वेळा उमेदवाराचे जन्म ठिकाण आणि सध्याचा पत्ता वेगवेगळ्या शहरातले असू शकतात. शिक्षणासाठी उमेदवार दुसऱ्या राज्यात/शहरात गेलेले असतात. अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये नोकरीचा किंवा इतर कामाचा अनुभव असेल तर त्याबद्दलही लिहायचे असते. नोकरीच्या निमित्ताने उमेदवार दुसऱ्या शहरात गेलेला असू शकतो. त्यामुळे तयारी करताना या सर्व शहरांबद्दल करावी लागेल.
समजा एखाद्या उमेदवाराने बंगळुरू शहरात नोकरी केली असेल तर त्याला बंगलोर बद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात?
बंगळुरू शहरात भारतातील सर्वात अधिक Uniicorn आणि स्टार्टअप आहेत म्हणजे या शहरात आयटी क्षेत्राचा प्रभाव का आहे? किंवा आयटी क्षेत्र बंगलोर परिसरात का फोफावलं आहे?
२. बंगळुरू शहराला उद्यानांचे शहर म्हणतात, इथल्या उद्यानांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे?
३. बंगळुरू तिथल्या सुखद हवामानासाठी प्रसिद्ध आहे. इथलं हवामान कशा स्वरूपाचं असतं हे सांगा.
४. बंगळुरू शहरामधल्या ट्राफिक congestion बद्दल अनेकवेळा वाचायला आणि ऐकायला मिळत असत, तुम्ही बंगळुरूचे पोलीस कमिशनर झालात तर तिथल्या ट्रॅफिकच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही काय कराल?
५. बंगळुरू शहरातल्या पाण्याच्या समस्येवर उपाय काय?
६. बंगळुरू शहरातल्या महत्वाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्था कोणत्या?
७. बंगलोर शहराचे बेंगलूरू नामांतर का केले आणि त्या विषयी तुमचा अभिप्राय काय आहे.
बंगळुरू मध्ये दरवर्षी एरो शो होतो. हा शो कोण आयोजित करतं , त्यात कुठची प्रात्यक्षिकं दाखवली जातात ह्याची माहिती असली पाहिजे. या शहरांमध्ये जन्मलेल्या किंवा तिथे कार्यरत असणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. बंगळुरू म्हटल्यावर इन्फोसिस आणि पर्यायाने नारायण मूर्ती, सुधा मूर्ती यांची आठवण येते. नंदन निलेकणी हे पण बंगळुरूचे त्यांनी भारत सरकारच्या काही उपक्रमांवर काम केलं त्याची माहिती असली पाहिजे.
पुणे आणि मुंबई या महाराष्ट्रातल्या दोन महत्वाच्या शहरांबद्दल काय प्रश्न येऊ शकतात हे आपण पाहिलं. ह्यावरून इतर शहरांबद्दलच्या प्रश्नांची यादी उमेदवारांना करता येऊ शकते. तयारी करताना ती पद्धतशीरपणे करावी. अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये एकापेक्षा जास्त शहरांचा उल्लेख असेल तर प्रत्येक शहराबद्दल चे प्रश्न वेगवेगळ्या पानावर लिहून काढावेत. सगळेच प्रश्न एकाचवेळी सुचतील असं नाही. जसे जसे प्रश्न सुचतील तसे ते लिहून काढावेत. आणि त्यांची तयारी करत राहावे. व्यक्तिमत्व चाचणीच्या दिवसाच्या आसपास त्या शहरात काही घडामोडी झाल्या तर त्याबद्दल वाचून ठेवावे. डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म मधल्या माहितीच्या आधारे विचारल्या जाऊ शकणाऱ्या बाकी प्रश्नांबद्दल पुढच्या लेखात.
mmbips@gmail. com
supsdk@gmail. com