‘शार्क टँक इंडि’याच्या चौथ्या सीझनमध्ये पॅनेलमध्ये एक प्रमुख परीक्षक ( judge) विनीता सिंग यांचा समावेश आहे. आज विनीता सिंगला एक मोठी उद्योजिका म्हणून ओळखले जाते. विनीता सिंग ही शुगर या सौंदर्यप्रसाधन कंपनीची संस्थापक आहे. शार्क टँक इंडियामध्ये परीक्षक म्हणून विनीता सिंग हे नाव घराघरांत पोहोचले आहे. पण, विनीताचा हा प्रवास सोपा नव्हता.
विनीताचे यशस्वी करिअर आणि कोट्यवधींच्या व्यवसायाबाबत सर्वांनाच माहीत आहे; पण त्यामागील तिचा संघर्ष आणि मेहनत मात्र कोणीच पाहत नाही. अनेक लोकांना माहीत नाही पण, विनीताने चक्क एक कोटी रुपयांची नोकरी नाकारून, स्वत:चा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. एक काळ असा होता की, जेव्हा ती फक्त १० हजार रुपयांमध्ये महिन्याचा खर्च भागवत होती; पण विनीताने आज जवळपास चार हजार कोटी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. तर, आपण ‘शार्क टँक’फेम उद्योजिका विनीता सिंग हिच्या प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट जाणून घेऊ ….
गुजरात ते मुंबई: विनीता सिंगचा प्रेरणादायी प्रवास (From Gujarat to Mumbai: The inspiring journey of Vineeta Singh)
विनीता सिंगचा जन्म गुजरातमधील आनंद येथे झाला; परंतु तिने तिचे बालपण भावनगरमध्ये तिच्या आजीबरोबर घालवले. या काळात तिचे वडील जे डॉक्टर होते, त्यांना दिल्लीतील ‘एम्स’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दिल्लीमध्ये स्थलांतरित झाले. दिल्ली हे विनीताचे नवीन घर बनले. विनीता ही एकुलती एक मुलगी होती.
विनीता सांगते, “जेव्हा तिने मुंबईत तिची कंपनी सुरू केली तेव्हा तिचे तीन सह-संस्थापक मुंबईतील होते; ज्यामुळे तिने मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला.”
फक्त १० व्या वर्षी, विनीता सिंगने सुरू केला पहिला व्यवसाय (Early entrepreneur’s journey: At just 10, Vineeta Singh started her first business)
बहुतेक मुलांचे १० वे वर्ष म्हणजे तसे बाहुल्या वा खेळण्यांशी खेळण्याचे वय; पण विनीता सिंग या वयातच व्यवसायाबाबत मूलभूत गोष्टी शिकत होती. इतक्या लहान वयात विनीताने तिच्या एका मैत्रिणीबरोबर एक छोटे मासिक सुरू केले होते, जे त्या ते घरोघरी जाऊन फक्त तीन रुपयांना विकत असे. परंतु लोक अनेकदा म्हणायचे, “ते मासिक खूप महाग आहे. पैशांबाबत विनीताचा हा पहिलाच अनुभव होता आणि त्यामुळे तिला ते किती महत्त्वाचे व मौल्यवान आहे याची जाणीव झाली. पूर्वी कधीही न मिळालेला धडा ती या अनुभवातून शिकली.
आयआयटी-आयआयएम ते उद्योजिका: विनीताने नाकारले १ कोटी रुपयांचे पॅकेज (From IIT-IIM to entrepreneurship: Vineeta Singh Left Rs 1 crore package for her passion)
विनीता सिंग ही अभ्यासात नेहमीच हुशार होती. तिने आयआयटी मद्रास आणि आयआयएम अहमदाबादमधून तिचे शिक्षण पूर्ण केले. आयआयटीमध्ये असताना, तिने अपयशाची शक्यता कमी असलेल्या पर्यायांना प्राधान्य दिले आणि यशस्वी होण्यासाठी सर्वांत सोपा मार्ग काय आहे यावर आधारित तिने तिचे ध्येय ठेवले. तिच्या आयआयएम प्लेसमेंटदरम्यान, तिने गुंतवणूक बँकिंगसाठी अर्ज केला. कारण- तो यशाचा सर्वांत सोपा मार्ग वाटत होता. या काळात तिने अनेक पुस्तके वाचली आणि स्वत:ची कंपनी सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. म्हणून जेव्हा तिला आयआयएममध्ये एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले, तेव्हा तिने ते नाकारले. केवळ २३ वर्षांच्या वयात तिने उद्योजिका होण्याची आवड जोपासण्याचा आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला.
२३ व्या वर्षी विनीता सिंगने दुसरा व्यवसाय सुरू केला (At 23, Vineeta Singh started her second business)
विनीताने वयाच्या २३ व्या वर्षी तिचा दुसरा व्यवसाय सुरू केला. महिलांसाठी एक अंतर्वस्त्र ब्रॅण्ड तयार करणे आणि तो ई-कॉमर्सद्वारे वाढवणे हा तिचा विचार होता. मोठा व्यवसाय उभारण्यासाठी तिला खूप पैशांची आवश्यकता होती. म्हणून ती १०-१२ गुंतवणूकदारांकडे निधी मिळविण्यासाठी गेले; पण तिला व्यवसायाचा कोणताही अनुभव नसल्यामुळे तिला सर्वत्र नकार मिळाला. त्यानंतर बाहेरून भांडवल उभारण्याची आवश्यकता नाही आणि केवळ वैयक्तिक बचत, सुरुवातीच्या ग्राहकांद्वारे मिळालेले उत्पन्न आणि भरपूर मेहनत यांच्या आधारे करता येण्यासारखा व्यवसाय सुरू करण्याचा आणि तो वाढवण्याचा निर्णय विनीताने घेतला.
फक्त १०,००० रुपयांच्या पगारावर ५ वर्षे सेवा देणारी कंपनी चालवली: (Ran a service company for 5 years with just Rs 10,000 salary: Vineeta Singh’s struggle story)
विनीताचा पहिला व्यवसाय अयशस्वी झाल्यानंतर विनीता सिंगने एक सेवा कंपनी सुरू केली, जिथे ती ग्राहकांना पार्श्वभूमी पडताळणीची (background verification services) सेवा पुरवत असत. एकेकाळी एक कोटी रुपयांचे पॅकेज नाकारले असले तरी या काळात ती फक्त १०,००० रुपये पगार घेत होती. तिच्या दृढनिश्चयाच्या जोरावर तिने पाच वर्षे ही कंपनी चालवली आणि तिचे उत्पन्न सुमारे ४-५ कोटी रुपयांपर्यंत वाढवले. पण, तिला अखेर लक्षात आले की, हे मॉडेल तिला मोठा व्यवसाय उभारण्यास मदत करणार नाही. त्यामुळे तिने ही कंपनी बंद करण्याचा आणि काहीतरी मोठे करण्याचा निर्णय घेतला.
नवऱ्याबरोबर सुरु केली ‘शुगर’ कंपनी : असा होता एक आघाडीचा ब्रँड बनवण्याचा प्रवास
२०१२ मध्ये विनीता सिंगने पती कौशिक मुखर्जी यांच्याबरोबर शुगर कॉस्मेटिक्स सुरू केले. संशोधनादरम्यान विनीताच्या असे लक्षात आले, “बहुतेक ब्रॅण्ड श्रीमंत ग्राहकांना लक्ष्य करून महागड्या उत्पादनांची निर्मिती करीत होते. विनीताने परवडणाऱ्या आणि तरुणांना आकर्षित करणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. महिलांच्या मेकअपच्या गरजा समजून घेण्यावर तिने लक्ष केंद्रित केले. त्यामुळे मेकअपने महिलांना समोरच्या परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने शक्तिशाली असल्याचा आत्मविश्वास मिळतो हे तिच्या लक्षात आले. बजेट फ्रेंडली किमतीत उच्च गुणवत्तेची उत्पादने देऊन, शुगर कंपनीने लवकरच लोकप्रियता मिळवली आहे. माऊथ पब्लिसिटीमुळे ब्रॅण्डची प्रसिद्धी झाली. मार्केटिंगवर जास्त खर्च न करता, विनीताची कंपनी वेगाने वाढली आणि तिच्या या कंपनीने सौंदर्यप्रसाधने उद्योगात विश्वासार्हता निर्माण करीत नावलौकिक कमावला.
विनीताच्या वडिलांनी तिला ठेवले स्वयंपाकघरापासून दूर (Vineeta’s father kept her away from the kitchen)
विनीता सिंगचे वडील तिला लहानपणी स्वयंपाकघरात काम करू देत नसत. त्यांना असा विश्वास होता की, त्यांची मुलगी महत्त्वाकांक्षी असल्यामुळे ती आयुष्यात मोठे काहीतरी करून दाखवू शकेल. त्यांची स्वतःची कौटुंबिक पार्श्वभूमी गरिबीची असल्याने, त्यांनी कठोर परिश्रम घेतले होते आणि चांगल्या शिक्षणामुळे त्यांनी एम्समध्ये प्रवेश मिळवला होता. विनीताने त्यांच्याप्रमाणेच तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि काहीतरी मोठे ध्येय ठेवावे, अशी त्यांची इच्छा होती.
विनीता सिंग पहिल्यांदाच ‘उद्योजक’ हा शब्द ऐकला (When for the first time Vineeta Singh heard the word ‘Entrepreneur’)
विनीता सिंग १७ वर्षांची असताना आयआयटीमध्ये जाण्यापूर्वी तिच्या एका प्राध्यापकाने तिला तिच्या आयुष्यातील ध्येयाबद्दल विचारले. तेव्हा तिने उत्तर दिले होते, “तिला श्रीमंत व्हायचे आहे.” त्यावर तिच्या प्राध्यापकांनी सुचवले, “मग उद्योजक व्हा.” विनीताने पहिल्यांदाच ‘उद्योजक’ हा शब्द ऐकला होता; पण आज ती स्वतः एक उद्योजिका बनली आहे.
आयआयएम अहमदाबादमध्ये असताना विनीता तिच्या सह-संस्थापकांना भेटली. तिथेच विनीताची भेट तिचा पती कौशिक मुखर्जी याच्याशी झाली, जो तिचा ज्युनियर होता. दोघांच्या आवडी-निवडी जुळल्या आणि एकमेकांबरोबर संवाद वाढल्याने ते एकमेकांच्या जवळ आले, ज्यामुळे त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
५००० रुपये भाडे असलेल्या १ रुम किचनपासून ४००० कोटी रुपयांचे साम्राज्यापर्यंत अविश्वसनीय प्रवास (From 1RK with Rs 5000 Rent to Rs 4000 crore empire: Vineeta Singh’s journey is incredible)
आज विनीता सिंग मुंबईतील पवई येथे एका अपार्टमेंटची मालकीण आहे, जो शहरातील सर्वांत महागड्या भागांपैकी एक आहे; पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तिच्या सुरुवातीच्या काळात, ती पवईमध्ये एका लहान भाड्याच्या घरात राहत होती. ते वन रूम किचन (एक खोली आणि स्वयंपाकघर) अपार्टमेंट होते, ज्याचे मासिक भाडे पाच हजार रुपये होते.