Success Story of Rohit Rai: यश कधीच सहजासहजी मिळत नाही. आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर यशाचा सुखद अनुभव घेता येतो. त्यात शिक्षणाचा वाटादेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. जितकं चांगलं शिक्षण तितका करिअरसाठी चांगला वाव, असं म्हणतात. पण एका आयआयटी ड्रॉपआउटनं ते सहज शक्य करून दाखवलंय. अखंड मेहनत आणि धाडसी निर्णयामुळे राहुल राय यानं अवघ्या पाच महिन्यांत २८६ कोटी कमावून दाखवले आहेत. चला तर मग जाणून घेऊ राहुल रायचा प्रेरणादायी प्रवास…

राहुल रायच्या यशाचा प्रवास

कोणत्याही पदवीशिवाय मोठं यश मिळवता येणं शक्य आहे का? पण, राहुल रायनं आयआयटीचं शिक्षण सोडलं. त्यानं पाच महिन्यांत २८६ कोटींची कंपनी स्थापन करून हे शक्य करून दाखवलं आहे. त्याची प्रेरणादायी गोष्ट त्या तरुणांसाठी आदर्श ठरते, जे धाडसी निर्णय घेऊन आपल्या स्वप्नांच्या मागे धावू इच्छितात.

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?

हेही वाचा… ज्या व्यवसायाची जन्मदात्या आईला वाटायची लाज त्यातूनच कमावले कोटी, वाचा टीका झुगारून यश मिळविणाऱ्या उद्योजिकेचा प्रेरणादायी प्रवास

नवीन मार्गाच्या शोधात आयआयटीला राम राम

२०१५ मध्ये आयआयटी बॉम्बेमधील ड्रॉपआउट विद्यार्थी असलेल्या राहुल राय यानं युनायटेड स्टेट्समधील प्रतिष्ठित व्हार्टन स्कूलमधून अर्थशास्त्र विषयात विज्ञान शाखेची पदवी घेण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट ठरला, ज्यामुळे त्याला त्याची पूर्ण क्षमता दाखवण्याची संधी मिळाली.

मॉर्गन स्टॅनली येथून करिअरला सुरुवात

पदव्युत्तर शिक्षणानंतर राहुलनं २०१९ मध्ये मॉर्गन स्टॅनलीमध्ये काम सुरू केलं, जिथे तो फॉरेन एक्स्चेंज मॅक्रो हेज फंड्स टीममध्ये विश्लेषक म्हणून काम करीत होता. पण अवघ्या एक वर्षानंतरच त्यानं आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि २०२० मध्ये त्यानं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी क्रिप्टो करन्सी मार्केट जोरात वाढत होतं आणि राहुलला ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिटल मालमत्तांमध्ये प्रचंड क्षमता दिसली. या ओळखीमुळे त्याच्या जीवनात एक मोठा बदल घडला.

हेही वाचा… भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

‘गॅमा पॉईंट कॅपिटल’ची स्थापना

२०२१ मध्ये राहुलनं ईश अग्रवाल आणि सनत राव या मित्रांसह ‘गॅमा पॉईंट कॅपिटल’ची सह-स्थापना केली. क्रिप्टो हेज फंडनं डिजिटल मालमत्तेतील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित कंले. राहुलची दूरदृष्टी आणि धोरणात्मक निर्णय यांमुळे कंपनीनं स्पर्धात्मक क्रिप्टो मार्केटमध्ये चांगली ओळख निर्माण केली. ‘गॅमा पॉईंट कॅपिटल’नं मिळविलेल्या जलद यशामुळे त्यानं लवकरच जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतलं.

‘ब्लॉकटॉवर कॅपिटल’द्वारे संपादन

मे २०२१ मध्ये ‘गॅमा पॉईंट कॅपिटल’ला ‘ब्लॉकटॉवर कॅपिटल’नं २८६ कोटी (अंदाजे ३५ दशलक्ष USD) मध्ये विकत घेतलं. ही खरेदी राहुल आणि त्याच्या टीमसाठी एक महत्त्वाचा आर्थिक टप्पा ठरली. त्यामुळे त्यांचा क्रिप्टो क्षेत्रातील लीडर्सचा दर्जा पक्का झाला. आज राहुल राय ब्लॉकटॉवर कॅपिटलमध्ये मार्केट-न्युट्रल स्ट्रॅटेजीजचे को-हेड म्हणून काम करीत आहेत आणि तो क्रिप्टो करन्सीच्या बदलत असलेल्या जगात अजूनही महत्त्वाचे योगदान देत आहे.

Story img Loader