Rail Coach Factory Recruitment 2023: रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे रेल्वे कोच फॅक्टरी येथे विविध पदांच्या ५५० जागांसाठींची भरती निघाली आहे. याबाबत rcf.indianrailways.gov.in साईटवर भरतची अधिकृत अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.
यामध्ये फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, सुतार, इलेक्ट्रिशियन, एसी आणि रेफ अशा विविध पदांसाठी भरती केली जाईल. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२३ आहे.
या भरतीबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
रेल कोच फॅक्टरी भरती २०२३ साठीच्या महत्त्वाच्या तारखा –
ऑनलाइन अर्जाची करण्याची लिंर ३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२३ आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
रेल्वे कोच फॅक्टरी ( Railway coach factory )
वेल्डर –
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेला असावा.
या पोस्टसाठी एकूण जागा – २३०
वयोमर्यादा – २४ वर्षांपर्यंत
फिटर –
हेही वाचा- अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठे बदल; सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या नवीन नियम
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – २१५
वयोमर्यादा : २४ वर्षांपर्यंत
इलेक्ट्रिशियन –
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – ७५
वयोमर्यादा : २४ वर्षांपर्यंत
AC & Ref. मॅकेनिक –
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – १५
वयोमर्यादा – २४ वर्षांपर्यंत
मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर –
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
जागा – प्रत्येक पदासाठी ५ एकूण १५
वयोमर्यादा – २४ वर्षांपर्यंत
वरील सर्व पदासांठी अर्च करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२३ ही आहे. शिवाय या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी rcf.indianrailways.gov.in या रेल कोच फॅक्टरी भरती २०२३ च्या अधिकृत बेवसाईटला भेट द्या.