RailTel Corporation of India Bharti 2023: रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) विविध रिक्त पदांसाठी भरतीची अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक अर्जदार 16 मे 2023 पूर्वी अर्ज करू शकतात. RailTel Corporation of India च्या अधिकृत संकेतस्थळाला www.railtelindia.com भेट देऊ उमेदवार अर्ज भरु शकतात. उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक पाहावी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी दिलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) अंतर्गत ‘पदवीधर अभियंता/ डिप्लोमा अभियंता’ पदाच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारीची निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे होईल.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उमेदवार पात्रतापदवीधर अभियंता/ डिप्लोमा अभियंतासाठी पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता पूर्ण करावी लागेल. उमेदवाराने पदाच्या संबधीत शाखेतून ६०% गुणांसह पदवीधर परिक्षा उतीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा- टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसतर्फे ‘या’ पदांसाठी होणार भरती; 16 मे पूर्वी भरा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

पदाचे नाव वेतनश्रेणी
पदवीधर अभियंता/ डिप्लोमा अभियंता
पदवीधर अभियंता – Rs. १४,०००/-
डिप्लोमा अभियंता – Rs. १२,०००/-

अर्ज करण्याची ऑनलाईन (नोंदणी) पद्धत
इच्छुक उमेदवारांनी BOAT च्या http://www.mhrdnats.gov.in या वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
ज्या उमेदवारांनी स्वतःची नोंदणी केली आहे आणि ज्यांचे अर्ज http://www.mhrdnats.gov.in या पोर्टलवर शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाइन प्राप्त झाले आहेत अशा उमेदवारांचाच विचार केला जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023

येथे पाहा अधिसुचना – https://drive.google.com/file/d/1NiQqgX9zB5U5Lq6L6CvDXQK16EztpzTE/view

हेही वाचा – NPCIL recruitment 2023: डेप्युटी मॅनेजरसह इतर पदांसाठी होणार भरती, १२ मे पासून करा अर्ज

निवड केवळ मुलाखतीद्वारे केली जाईल.
मेरिट लिस्टमधून, उमेदवारांना मुलाखतीला हजर राहण्यासाठी निवडले जाईल.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी त्यांचा मूळ अर्ज सर्व आवश्यक शैक्षणिक आणि इतर सहाय्यक कागदपत्रे/प्रकल्प अहवाल/प्रकाशन इत्यादींसह यावे

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railtel corporation of india recruitment for 23 vacancies file application before 16 may know process snk
Show comments