Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. मग तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे जर तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची असेल तर तर तुम्ही ही माहिती संपूर्ण वाचा. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे (SECR), कर्मचारी विभाग, बिलासपुर डिव्हिजनने बिलासपुर डिव्हीजनमध्ये अप्रेंटीस पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहे. इच्छूक आणि योग्य उमेवदवार या पदांवर दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेच्या अधिककृत संकेतस्थळाला (secr.indianrailways.gov.in ) भेट देऊन अर्ज करू शकतात. ३ जून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती प्रक्रियेतंर्गत ५४८ पदांची भरती होणार आहे.
रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
उमेदवार जो या पदांवर अर्ज करु इच्छितात, त्यांच्याकडे मान्यता प्राप्त संस्थेतून संबधित शाखेत आयटीआयसह १०वी पास उतीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
रेल्वे भरतीसाठी आवश्यक तारखा
या पदांसाठी अर्ज जमा करण्याची सुरूवात ३ मे २०२३ला सुरू झाली आहे. या पदांवर निर्धारित स्वरुपात अधिकृत वेबसाईटावर ३ जून २०२३ पर्यंत किंवा त्याआधी अर्ज करु शकतात.
रेल्वे भरतींतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या
एकूण ५४८ पदे
हेही वाचा – NPCIL recruitment 2023: डेप्युटी मॅनेजरसह इतर पदांसाठी होणार भरती, १२ मे पासून करा अर्ज
येथे पहा अर्ज पाठविण्याची लिंक आणि अधिसुचना
रेल्वे भरती २०२३ला अर्ज पाठविण्याची लिंक
रेल्वे भरती २०२३साठी अधिसूचना
रेल्वे भरतीसाठी वयोमर्यादा
जो उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छितात, त्यांची वयोमर्यादा ०१ जुलैपर्यंत कमीत कमी १५ वर्ष आणि अधिकतम २४ वर्ष व्हायला पाहिजे. याशिवाय नियामनुसार वयोमर्यादेत सुट दिली जाईल.