Railway Recruitment 2023: रेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आंनदाची बातमी आहे. रेल्वे भरती सेलने (RRC) बंपर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने असिस्टंट लोको पायलट, टेक्निशिअन भरती आयोजित केली आहे. या अभियानांतर्गत १०१६ पदांवर भरती करणार आहे. इच्छूक उमेदवार रेल्वेमध्ये या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइट http://www.secrindianrailways.gov.in माध्यमातूनऑनलाइन अर्ज करू शकतात. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरु केली आहे. उमेदवार रेल्वेमध्ये या भरतीसाठी २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता.
RRC Recruitment Details: पदांची संख्या
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनेने एकूण १०१६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये असिस्टंट लोको पायलटचे ८२० पदे, टेक्निशिअनची पदे १३२ पदे आणि ज्युनिअर इंजनिअरसाठी ६४ पद समाविष्ट आहेत.
Railway Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता
असिस्टंट लोक पायल्टसाठी मान्यता प्राप्त शाळा शिक्षण बोर्ड १०वी पास असण्याबरोबर संबंधित क्षेत्रामध्ये आईआयटी प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. टेक्निशिअन पदासाठी १०वी बरोबरच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता पदांसाठी, उमेदवारांना मूलभूत प्रवाहात तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे.
Railway Recruitment 2023: वयोमर्यादा
रेल्वेमध्ये नोकरीसाठी १८ वर्षाच्या तरुण अर्ज करू शकते. उमेदवारांचे कमीत कमीत वय १८ वर्ष आणि जास्ती जास्त वय ४२ वर्ष असले पाहिजे.
Railway Recruitment 2023: निवड प्रक्रिया
रेल्वेमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाईल. ही परीक्षा कॉम्प्युटर आधारे होईल. परीक्षेमध्ये उतीर्ण होणाऱ्या उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राऊंडमधून जावे लागेल.
Railway Recruitment 2023 नोटिफिकेशन – https://secr.indianrailways.gov.in/uploads/files/1689744127508-GDCE%202023%20final.pdfhttps://secr.indianrailways.gov.in/uploads/files/1689744127508-GDCE%202023%20final.pdf
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने भरती २०२३ साठी अर्ज करू शकता
- सर्व उमेदवार प्रथम दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट http://www.secr ला भेट देऊ शकतात. indianrailways.gov.in वर जा.
- रिक्रूटमेंट/न्यूज/प्रेस रिलीजवर क्लिक करा.
- भरती लिंकवर क्लिक करा.
- आता अर्ज भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- RRC SECR अर्ज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी तो मुद्रित करा.