Railway Recruitment 2023: रेल्वे भरती सेल, नॉर्दन रेल्वे अंतर्गत २,३, ४, आणि ५ लेवलच्या २१ पदांसाठी भरती काढली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ मेपासून सुरू झाली आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख २ जून २०२३ आहे. ही भरती स्पोर्ट्स कोट्यांर्तगत केली जाणार आहे. निवड प्रक्रिया चाचणी १६ जून २०२३ ला होणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आर्चरी मॅन, जिमनॅस्टिक मॅन, हँडबॉल, मॅन, क्रिकेट वूमेन, बास्केटबॉल वूमेन, बॅटमिंटन मॅन, कबड्डी मॅन, बॉडी बिल्डिंग मॅनला स्पोर्टसमध्ये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे भरती 2023: वयोमर्यादा –
१ जुलै २०२३ पर्यंत उमेदवाराचे वय १८ वर्षापासून २५ वर्ष असले पाहिजे. वयोमर्यादेत कोणतीही सुट दिली जाणार नाही.

हेही वाचा : बँक ऑफ बडोदामध्ये १५७ पदांसाठी होणार भरती, ८० हजारांहून अधिक मिळू शकतो पगार, या तारखेपूर्वी भरा अर्ज

रेल्वे भरती 2023: पगार
लेवल २- १९९००- ६३२०० रुपये
लेवल ३ – २१७००- ६९१०० रुपये
लेवल ४- २५५००- ८११०० रुपये
लेवल ५ – २९२००- ९२३०० रुपये

रेल्वे भरती 2023: पात्रता – https://www.rrcnr.org/rrcnr_pdf/Notification_of_Sports_2023_24.pdf
लेवल २ आणि ३च्या पदासाठी उमेदवार बारावी पास असले पाहिजे.
लेवल ४ आणि ५च्या पदासाठी उमेदवार कोणत्याही विषयातून पदवीधर असला पाहिजे.

वरील पदांसाठी स्पोर्ट्ससंबधीत पात्रता अधिसूचनेमध्ये पाहू शकता

रेल्वे भरती 2023: अशी होईल उमेदवाराची निवड

सर्व प्रथम अर्जाची तपासणी आणि छाननी होईल. त्यानंतर कागपत्रांची पडताळणी केली जाईल आणि मग चाचणी होईल.

निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षाच्या प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

हेही वाचा : इस्त्रोमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, ८१ हजार पर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

रेल्वे भरती 2023: अर्ज शुल्क

अर्ज शुल्क – ५०० रुपये
एससी, एसटी व महिला – २५० रुपये
अर्ज शुल्क ऑनलाईम भरता येऊ शकते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway recruitment 2023 jobs in rrb rrc railway vacancy for 12th pass and graduate from sports quota salary up to 90 thousand snk
Show comments