RRB Technician Recruitment : नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता Railway Recruitment Board (RRB) अंतर्गत मेगाभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण ९१४४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. “तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II” या दोन पदांसाठी ही भरती असून इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ९ मार्च पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पात्र उमेदवाराची वयोमर्यादा , अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि अर्ज कसा भरावा, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव – Railway Recruitment Board (RRB) अंतर्गत खालील दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

Appeal will be filed in the Supreme Court regarding the cancellation of the independent candidature application form Mumbai
चेंबूरमधील अपक्ष उमेदवार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Night special local for the convenience of employees voters Mumbai news
कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी रात्रकालीन विशेष लोकल धावणार
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
  • तंत्रज्ञ ग्रेड I
  • तंत्रज्ञ ग्रेड II

पदसंख्या – तंत्रज्ञ ग्रेड I आणि तंत्रज्ञ ग्रेड II या दोन पदांसाठी एकूण ९१४४ जागा रिक्त आहे. तंत्रज्ञ ग्रेड I साठी आणि तंत्रज्ञ ग्रेड II साठी या जागा विभागल्या आहेत. त्या खालील प्रमाणे –

  • तंत्रज्ञ ग्रेड I – ११००
  • तंत्रज्ञ ग्रेड II – ७९००

वयोमर्यादा – या पदासाठी पात्र उमेदवाराची वयोमर्यादा खालीलप्रमाणे असावी.

  • तंत्रज्ञ ग्रेड I – १८ ते ३६ वर्षे
  • तंत्रज्ञ ग्रेड II – १८ ते ३३ वर्षे

अर्ज शुल्क – सर्व उमेदवारासाठी अर्ज शुल्क हा ५०० रुपये आहे तर SC,ST,Ex-Serviceman, PWED, आणि महिला उमेदवारासाठी अर्ज शुल्क २५० रुपये आहे.

हेही वाचा : DRDO मध्ये नोकरीची सुवर्ण संधी, परिक्षा नाही तर थेट मुलाखत, जाणून घ्या सविस्तर माहिती

अर्ज पद्धत – तंत्रज्ञ ग्रेड I आणि तंत्रज्ञ ग्रेड II या दोन पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

पगार – पात्र उमेदवारांचा पदांनुसार पगार खालीलप्रमाणे असेल

  • तंत्रज्ञ ग्रेड I- २९,२००
  • तंत्रज्ञ ग्रेड II – १९, ९००

निवड प्रक्रिया – या पदांसाठी निवड प्रक्रिया ही संगणक आधारित परिक्षाद्वारे असेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख – ९ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ एप्रिल २०२४

अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

अधिसुचना – https://www.rrbajmer.gov.in/Upload_PDF/638423208075866721.pdf

अर्ज कसा करावा ?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घेता त्यापूर्वी अर्ज करावा.
नीट माहिती भरून शेवटी प्रवेश शुल्क भरावा.
आणि अर्जाची प्रिंट आपल्याजवळ काढावी.