Ratan Tata helped couple to build crores business: कॅशकरोचे सह-संस्थापक स्वाती आणि रोहन भार्गव यांनी रतन टाटा यांच्या पाठिंब्याने भारताच्या स्टार्टअप जगतात स्वतःचे नाव कमावले आहे. युनायटेड किंग्डमच्या उपक्रमानंतर भारतात कॅशकरो लाँच केल्यानंतर, या कपलने आर्थिक उत्पादनांमध्ये विस्तार करण्याचे आणि आगामी वर्षांत लक्षणीय वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

कॅशकरोचे संस्थापक स्वाती आणि रोहन भार्गव यांनी त्यांचा प्रवास मैत्रीपासून सुरू केला, नंतर त्यांनी लग्न केलं आणि बिझनेस पार्टनर्स बनले. त्यांच्या लग्नानंतर, स्वातीने कॅशबॅक वेबसाइटद्वारे त्यांच्या हनिमूनचं पॅकेज बुक केलं आणि यातूनच त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मची कल्पना निर्माण झाली.

हेही वाचा… अवघ्या २७व्या वर्षीच अब्जाधीश, ३ महिन्यातच उभारली कोटींची कंपनी, वाचा कोण आहे ‘हा’ भारतीय उद्योगपती?

एप्रिल २०११ मध्ये या कपलने त्यांची पहिली कॅशबॅक साइट, Pouring Pounds लाँच केली. या उपक्रमाच्या यशाने ते भारतात परतले. या कपलने गुडगाव, भारत येथे स्थलांतर केले आणि कॅशकारो, सवलत आणि विशेष कूपन ऑफर करणारे कॅशबॅक प्लॅटफॉर्म सादर केले. कॅशकरो झपाट्याने वाढले, देशातील अग्रगण्य प्लॅटफॉर्म बनले.

जेव्हा रतन टाटा आणि कलारी कॅपिटलसारख्या हाय-प्रोफाइल गुंतवणूकदारांकडून त्यांनी निधी मिळवला आणि कॅशकारोच्या वाढीला आणि विस्ताराला चालना दिली, तेव्हा त्यांच्या स्टार्टअपला मोठा फायदा झाला.

हेही वाचा… परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, शून्यातून कसं निर्माण केलं कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास

ET च्या अहवालानुसार, कॅशकरोने २०२२ मध्ये २२५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आणि अलीकडेच आर्थिक वर्ष-२०२४ साठी ३०२ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग महसूल नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत २१.५ टक्के वाढ दर्शवितो.

२५ दशलक्ष युजर्स बेससह, कॅशकरो आता विमा, कर्ज आणि म्युच्युअल फंड यांसारख्या वित्तीय सेवांचा समावेश करण्यासाठी आपल्या ऑफरचा विस्तार करत आहे, ज्याचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष-२०२५ पर्यंत ४०० कोटींहून अधिक महसूल मिळवणे आहे.

हेही वाचा… ना कॉलेज, ना कोणती पदवी; वयाच्या १२व्या वर्षी कोडिंग शिकून बनला कोटींचा मालक, वाचा किशन बागरियाचा प्रेरणादायी प्रवास

भारतातील सर्वात मोठ्या कॅशबॅक प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून, कॅशकरो १,५०० वेबसाइट्सवर बचत ऑफर करत आहे. स्वाती आणि रोहन भार्गव भविष्यातील वाढीवर लक्ष केंद्रित करत आहेत, भारतातील ऑनलाइन खरेदीमध्ये आणखी क्रांती घडवून आणत आहेत. स्वाती आणि रोहन भार्गव यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.