RBI Bharti 2023: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारतीय रिझर्व बँकेने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत डेटा वैज्ञानिक, डेटा अभियंता, आयटी सुरक्षा तज्ञ, आयटी सिस्टम प्रशासक, आयटी प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, वरिष्ठ विश्लेषक, विश्लेषक, सल्लागार या पदाच्या ६६ जागा कराराच्या आधारावर भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.rbi.org.in या वेबसाइटद्वारे भरता येणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय रिझर्व बँके भरती २०२३ –
पदाचे नाव –
डेटा वैज्ञानिक, डेटा अभियंता, आयटी सुरक्षा तज्ञ, आयटी सिस्टम प्रशासक, आयटी प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, वरिष्ठ विश्लेषक, विश्लेषक, सल्लागार.
एकूण रिक्त पदे – ६६
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/
शैक्षणिक पात्रता –
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेळी आहे. भरतीसाठीची पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी (https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/LATERALRECRUITMENTFOR25POSTS1E51E7D3790E42C38759A9E6A11A39D3.PDF) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
वयोमर्यादा – २३ ते ४० वर्षांच्या दरम्यान.
अर्ज शुल्क –
- SC/ST/PwBD – १०० रुपये + १८ टक्के GST
- GEN/OBC/EWS – ६०० रुपये + १८ टक्के GST
पेमेंट करण्याची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख – २१ जून २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जुलै २०२३