RBI Grade B Application 2023: रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी ऑफिसर भरतीची तयारी सुरू आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध विभागामध्ये ग्रेड बी लेव्हल करिता एकूण २९१ पदांवर अधिकाऱ्यांची भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. बँकेद्वारा मंगळवार ६ जून २०२३ ला जाहीर केलेल्या सुचनेनुसार उमेदवार आपला अर्ज १६ जून पर्यंत जमा करू शकतात. आरबीआयने ग्रेड बी ऑफिसर भरतीसाठी अधिसुचना २६ एप्रिलला जाहीर केली आहे आणि अर्जाची प्रक्रिया ९ मे रोजी सुरु केली आहे ज्याची शेवटची तारीख ९ जून होती. पण आता अंतिम मुदतीत एक आठवड्याची केली वाढ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

RBI Grade B 2023: कुठे आणि कसे करु शकतात आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज

अशा परिस्थितीमध्ये ज्या उमेदवारांना पूर्व नियोजित शेवटीची तारीख ९ जून पर्यं आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज करू शकत नव्हते. नवीन घोषणनेनुसार शेवटची तारीख तोपर्यंत आपला अर्ज जमा करु शकतात त्यासाठी उमेदवारांना बँकेच्या वेबसाइटवर rbi.org.inला भेट देऊ शकतात आमि पुन्हा करिअर सेक्शनमध्ये जावे लागेल. येथे अॅक्टिव्ह लिंक किंवा खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. आज पेजवर उमेदवारांना सुरुवातीला नोंदणी करा आणि नोंदणीकृत तपशीलने लॉग इन करा. उमेदवार आपला अर्ज जमा करु शकतात. या दरम्यान उमेदवारांना निर्धारित ८५० रुपये (जीएसटी ) अर्ज शुल्काचे भरावे लागेल आणि ऑनलाईनस्वरुपात हा अर्ज भरू शकतात. पण आरक्षित वर्गासाठी शुल्क १०० रुपये जीएसटी भरावा लागेल.

हेही वाचा – SBI Recruitment 2023: भारतीय स्टेट बँकेत २८ पदांसाठी होणार भरती, परिक्षेशिवाय होईल निवड, ७५ लाखांपर्यंत पॅकेज मिळणार

आरबीआय ग्रेड बी ऑफिसर भरती २०२३ अधिसुचना पीडीएफ डाऊनलोड करा –https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/DADVTGRB09052023FA65E4FB1C2CF473396B4FD7E5F69CDDE.PDF
आरबीआय ग्रेड बी ऑफिसर भरती २०२३ अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/rbioapr23/

हेही वाचा – RBI Recruitment 2023: रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची संधी, २९१ पदांसाठी होणार भरती, असा भरा अर्ज

RBI Grade B Recruitment 2023: परीक्षेसाठी शहर बदलण्याची शेवटची संधी

RBI ने ग्रेड B अधिकार्‍यांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एका आठवड्याने वाढवली आहे आणि ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज सादर केले आहेत त्यांना परीक्षेचे शहर बदलण्याची संधी देखील दिली आहे. पण, ही सुविधा फक्त इंफाळ (मणिपूर) च्या उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. हे उमेदवार नोटीसमध्ये दिलेल्या परीक्षेतील शहरांपैकी कोणतेही एक निवडू शकतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi grade b application 2023 last date extended for 291 vacancies now submit form by june 16 at rbi org in exam city change snk
Show comments