RBI Grade B Recruitment 2023: बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना चांगली संधी मिळत आहे. भाभारतीय रिझर्व्ह बँकेने विविध विभांगामध्ये ग्रेड बीच्या पदांसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. ९ मे पासून अर्जाची प्रक्रिया सुरू केल्या आहेत. इच्छूक उमेदवार या रिक्त पदांसाठी अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in वर या रिक्त पदांसाठी ९ जून २०२३ साठी रात्री ६ वाजेपर्यंत अर्ज पाठवू शकता. आरबीआय ग्रेड बी भरती मोहिमेंतर्गच एकूण २९१ रिक्त जागांची भरती होणार आहे.

आरबीआय ग्रेड बी भरती 2023 रिक्त जागा तपशील

  • अधिकारी ग्रेड बी(डीआर) जनरलसाठी २२२ पदे
  • अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीईपीआरसाठी ३८ पदे
  • अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीएसआईएमसाठी ३१ पदे

आरबीआय ग्रेड बी- जनरल फेज १ परिक्षा ९ जुलै आणि ग्रेड बी डीईपीआर आणि डीएसआयएम च्या परिक्षा १६ जुलै २०२३ ला आयोजित केल्या जातील.

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Careers in banking jobs
नोकरीची संधी: बँकेत ‘सिनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी संधी
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती

हेही वाचा- Railway Recruitment 2023: 10वीसह ITI उतीर्ण असाल तर परीक्षेशिवाय मिळू शकते रेल्वेत नोकरी! पगारही मिळेल चांगला

आरबीआय ग्रेड बी भरती 2023 वयोमर्यादा

आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा १ मे २०२३ला २१ वर्ष ते ३० वर्षातंर्गत व्हायला पाहिजे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेतमध्ये सुट देण्यात आली आहे.

आरबीआय भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

आरबीआय ग्रेड बी-जनरल पदासाठी किमान पात्रता ही किमान ६०% गुणांसह बॅचलर पदवी आहे, तर डीईपीआर आणि डीएसआयएम पदासाठी पदव्युत्तर पदवी आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सविस्तर सूचना एकदा वाचावी.

हेही वाचा – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे ‘या’ रिक्त पदांसाठी होणार भरती, 16 मे पूर्वी भरा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

आरबीआय ग्रेड बी भरती 2023 अर्ज शुल्क

आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज शुल्क सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु ८५० आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी रु.१०० आहे.

आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक – https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=4259

आरबीआय ग्रेड बी भरती 2023: वेतन

आरबीआय ग्रेड बीच्या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना ५५,२०० रुपये प्रारंभिक मूळ वेतन मिळेल. ग्रेड ब अधिकाऱ्यांना वेळोवेळी लागू असलेल्या नियमांनुसार ग्रेड भत्ता, महागाई भत्ता, स्थानिक नुकसान भरपाई भत्ता, विशेष श्रेणी भत्ता, शैक्षणिक भत्ता, घरभाडे भत्ता दिला जाईल. सध्या, मासिक सकल वेतन (एचआरए शिवाय) रु. १,१६,९१४असेल, (अंदाजे) जर घरभाडे भत्ता सुरू केले तर मूळ वेतनाच्या १५ % दराने बँकेने निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही.

हेही वाचा- NPCIL recruitment 2023: डेप्युटी मॅनेजरसह इतर पदांसाठी होणार भरती, १२ मे पासून करा अर्ज

आरबीआय ग्रेड बी भरती 2023: अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर भेट द्या
  • रिक्त पदांवर जा आणि ग्रेड बी साठी लिंकवर क्लिक करा.
  • IBPS पोर्टलवर नोंदणी करा.
  • फॉर्म भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.