Reserve Bank of India Grade B Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि आरबीआय ‘ग्रेड बी’ भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने विविध विभागांमध्ये ग्रेड बी ऑफिसर्सच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. २५ जुलैपासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून, तुम्ही १६ ऑगस्ट किंवा त्यापूर्वी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता. तर या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, पदसंख्या, अर्ज कसा करायचा, वयोमर्यदा, शैक्षणिक पात्रता याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

RBI Grade B Recruitment 2024 : रिक्त पदे

अधिकारी ग्रेड बी(डीआर) जनरल – ६६ जगा
अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीईपीआर – ३१ जागा
अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीएसआईएमच्या – ७ जागा
अशा ९४ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

RBI Grade B Recruitment 2024 : अर्ज कसा करायचा?

पायरी १ : सगळ्यात पहिला rbi.org.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

पायरी २ : आरबीआय ग्रेड बी ऑफिसर सध्याची नवीन भरती असणाऱ्या बटणावर क्लिक करा

पायरी ३ : ‘New Registration Button’ वर क्लिक करा आणि सर्व माहिती भरा. नंतर ‘सेव्ह’ बटणावर क्लिक करा

पायरी ४ : नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल. आता उर्वरित अर्ज भरण्यासाठी पुन्हा लॉग इन करा.

पायरी ५ : आता तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. सर्व माहिती व्हेरिफाय करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा

पायरी ६ : अर्ज शुल्क भरा.

पायरी ७: भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट सुद्धा काढून ठेवा.

RBI Grade B Recruitment 2024 : कोणती कागदपत्रे लागतील ?

विहित नमुन्यातील उमेदवाराचे छायाचित्र
विहित नमुन्यातील उमेदवाराची स्वाक्षरी
डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (जर उमेदवाराचा डाव्या हाताचा अंगठा नसेल, तर तो उजवा अंगठा वापरू शकतो.)
लिखित घोषणापत्राची प्रत

अर्ज शुल्क –

एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी १०० रुपये प्लस १८ टक्के जीएसटी. तर जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएसएस उमेदवारांसाठी ८५० रुपये प्लस १८ टक्के जीएसटी इतके अर्ज शुल्क असणार आहे.

शैक्षणिक पात्रता उमेदवाराने अधिसूचनेत पाहून घ्यावी…

अधिसूचना : https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=4470

अधिकारी या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात…

लिंक : https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=4470