देशातील सर्व बँकांची केंद्रीय बँक अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. रिझर्व्ह बँकेने फार्मासिस्ट या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २५ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल आहे. पात्र उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून जाऊन या पदासाठी अर्ज करू शकतात. पण ही भरती प्रक्रिया कशी केली जाणार, या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि वयोमर्यादा किती याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता

१) अर्जदारांची शैक्षणिक पात्रता मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्षपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.
२) अर्जदाराकडे फार्मसी अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणीकृत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी विषयातील डिप्लोमाची किमान पात्रता असणे आवश्यक आहे.
३) फार्मसीमध्ये बॅचलर पदवी (बी. फार्म) असलेले अर्जदारही या पदासाठी अर्ज करू शकतात.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
Career mantra MPSC Graduation STUDY FOR COMPETITIVE EXAMINATION job
करिअर मंत्र
Job Opportunity Recruitment in Territorial Army Units career news
नोकरीची संधी: टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

या पदासाठी निवड प्रक्रिया कशी असेल?

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम बँक मुलाखत घेईल. मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी किमान पात्रता मानके इत्यादी वाढवण्याचा अधिकार बँकेकडे आहे. उमेदवारांची सर्व शैक्षणिक योग्यता ( पोस्ट ग्रॅज्युएशन/ डिग्री/ डिप्लोमा/ ) वेगवेगळ्या बँकांपासून डिस्पेन्सरींचं अंतर, पीएसबी/पीएसयू/ सरकारी संघटना/ आरबीआय या सर्वांसंदर्भातील अनुभवाच्या आधारे पुढील फेरीसाठी उमेदवार निवडले जातील. यानंतर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मेडिकल टेस्ट होईल आणि पुढील प्रक्रिया पार पडले. मात्र या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पण ही भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार आहे.

अर्ज कसा करायचा?

आरबीआयच्या फार्मासिस्ट भरती २०२३ साठी इच्छुक उमेदवार १० एप्रिलपर्यंत ऑफलाईन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज करु शकतात. यात व्यावसायिक, शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, वयाचा पुरावा इत्यादी कागदपत्रांची फोटोकॉपी आणि अर्ज सीलबंद कव्हरमध्ये प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – 400001 वर १० एप्रिलपर्यंत सायंकाळी ५ वाजण्याच्या आधी पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी आरबीआयच्या rbi.org.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.

पगार

आरबीआयच्या फार्मासिस्ट भरती २०२३ साठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना प्रति तास ४०० रुपये पगार निश्चित करण्यात आला आहे. प्रतिदिन पाच तासांच्या कालावधीसह कमाल वेतन २००० रुपये पेक्षा जास्त नसेल. पण या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अधिकचे वेतन, भत्ता किंवा इतर कोणत्याही सुविधा दिल्या जाणार नाही. हा कॉन्ट्रॅक्ट जास्तीत जास्त 240 दिवसांच्या कालावधीसाठी असेल. मुंबई/नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या कोणत्याही दवाखान्यात या उमेदवारांना पाठवण्याचा अधिकार बँकेकडे आहे.