RBI Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने असिस्टंट भरतीसाठी अर्ज मागवले आहे. बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या लेखात आम्ही या भरतीबाबत माहित देणार आहोत. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की, परिक्षा दोन भागात (पूर्व आणि मुख्य परीक्षा) आयोजित केली जाईल. त्यानंतर भाषा प्राविण्य चाचणी(Language Proficiency Test) घेतली जाईल. लक्षात ठेवा की, पूर्व परिक्षा पास करणारे उमेदवार मुख्य परिक्षेसाठी बसू शकतात. इच्छूक उमेदवार ४ ऑक्टोबरपर्यंत अधिकृत वेबसाईट Opportunities.rbi.org.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची विंडो आजपासून ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.
या भरतीसाठी ४५० व्हॅकन्सी आहेत. पूर्व परिक्षा २१ आणि २३ ऑक्टोबर या तारेखला होण्याची शक्यता आहे तर मुख्य परिक्षा २ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! पूर्व रेल्वेत ३११५ जागांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर
आरबीआय भरती २०२३: असा करा अर्ज
सर्वात पहिल्यांदा वेबसाइट Opportunities.rbi.org.in वर जा
त्यानंतर क्लिक करा आणि लिंक वर क्लिक करा
आता न्यू फॉर लिंक वर क्लिक करा
तुमची बेसिक माहिती जसे- नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी टाका
आता आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा
अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे भरा
हे सेव करा नंतर सबमिट करा आणि फीस जमा करा
आता अर्जाची प्रत डाउनलोड करा.
अर्जाची लिंक – https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=4315
अधिसुचना – https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/RECRUIT130920239540021778D246E4B07F7D1AA681D055.PDF
अर्ज शुल्क?
खुल्या, EWS आणि OBC प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क ४५० रुपये आहे. याशिवाय यावर वेगळा १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. तर SC, ST, PWD आणि माजी सैनिकांसाठी हे शुल्क ५० रुपये + १८ टक्के GST आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क नाही.
RBI Recruitment 2023: कोण अर्ज करू शकतो
भारतीय नागरिक या पदांसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय, अर्जदार हा नेपाळ, भूतान आणि तिबेटमधील निर्वासित असावा जो १ जानेवारी १९६२ पूर्वी कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या उद्देशाने भारतात आला होता. त्याचबरोबर पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका, पूर्व आफ्रिकन देश केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे, इथिओपिया आणि व्हिएतनाममधून स्थलांतरित झालेली भारतीय वंशाची व्यक्ती देखील अर्ज करू शकते परंतु त्यांचा भारतात कायमचे स्थायिक होण्याचा मानस असावा.
उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते. म्हणजेच, २ सप्टेंबर १९९५ पूर्वी आणि १सप्टेंबर २००३ नंतर (दोन्ही दिवसांदरम्यान) जन्मलेले उमेदवारच फक्त हा अर्ज करण्यास पात्र आहेत.
RBI भरती 2023: पेपर पॅटर्न कसा असेल?
पूर्व आणि मुख्य परीक्षा बहुपर्यायी असतील. प्राथमिक परीक्षेत तीन विभाग असतील. ३० गुणांसाठी इंग्रजी भाषा (३० प्रश्न), ३५ गुणांसाठी संख्यात्मक क्षमता (३५ प्रश्न) आणि ३५ गुणांसाठी तर्क क्षमता (३५ प्रश्न). परीक्षेचा कालावधी ६० मिनिटे आहे आणि १०० प्रश्नांसाठी जास्तीत जास्त १०० गुण आहेत.
मुख्य परीक्षेत पाच विभाग असतील – ४० गुणांसाठी तर्क (४० प्रश्न), ४० गुणांसाठी इंग्रजी भाषा (४० प्रश्न), ४० गुणांसाठी संख्यात्मक क्षमता (४० प्रश्न),४० गुणांसाठी सामान्य जागरूकता (४० प्रश्न) आणि संगणक ज्ञान (४० प्रश्न) ४० गुणांसाठी. १३५ मिनिटांच्या कालावधीसाठी एकूण गुण २०० आहेत आणि प्रश्नांची संख्या देखील २०० आहे.