रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) येथे ड्रायव्हर पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. बॅंकेला वाहन चालकांची गरज असल्याने ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, काम करण्याचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची माहिती जाणून घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) येथे ड्रायव्हर पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२३ आहे.
एकूण रिक्त पदे – ०५
पदाचे नाव – ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता –
१० वी पास + हलके वाहन चालक (LMV) परवाना + १० वर्षेचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – २८ ते ३५ वर्षापर्यंत तर मागासवर्गीयांना ५ वर्षाची सूट देण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क –
खुला वर्ग आणि ओबीसीसाठी ४५० रुपये + GST
मागासवर्गीय/ महिला/ माजी सैनिक ५० रुपये + GST
नोकरी ठिकाण – मुंबई</strong>
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात २७ मार्च २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२३
भरतीची जाहीरात बघण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1StJv8_D-Plr1Tz-ClgSJ38S90jFn-Mqk/view) या लिंकला भेट द्या.
या भरतीसाठीची अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बॅंकेच्या https://www.rbi.org.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.