REC recruitment 2023: ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिडेट (Rural Electrification Corporation Limited) या शासनाच्या संस्थेमध्ये भरती सुरु होणार आहे. १२५ रिक्त जागांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज करायची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२३ पर्यंत यामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करुन भरती निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. recindia.nic.in. या अधिकृत वेबसाइटवर या भरती संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या भरतीमध्ये सहभागी होणारे उमेदवार इंजिनीअरिंग डिसिप्लेन, फायनान्स अ‍ॅंड अकाउंट्स डिसिप्लेन, ह्युमन रिसोर्स डिसिप्लेन, इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी डिसिप्लेन, कॉरपोरेट कम्युनिकेशन डिसिप्लेन, लॉ डिसिप्लेन, कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी डिसिप्लेन अशा काही विभागातील नोकऱ्यांसाठी अर्ज करु शकतात. विभाग आणि पद यांच्यावरुन वेतनासंबंधित निर्णय घेतले जातील.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Ramshej Fort Conservation, Shivkarya Gadkot Sanstha Campaign, Ramshej Fort,
नाशिक : रामशेज किल्ला संवर्धनार्थ अशी ही धडपड, शिवकार्य गडकोट संस्थेची श्रमदान मोहीम

आणखी वाचा – महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमधील सरकारी रुग्णालयात ५ हजार जागांसाठी मेगाभरती; सविस्तर माहिती जाणून घ्या

आरईसी लिमिटेडद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना १००० रुपये शुल्क म्हणून भरावे लागणार आहेत. अनुसूचित जाती-जमातीमधील उमेदवार, दिव्यांग व्यक्ती, माजी सैनिक आणि अंतर्गत उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट देण्यात येईल.

ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिडेटच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी-

  • recindia.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.
  • होमपेजवरील Career या टॅबवर क्लिक करावे.
  • त्यामध्ये भरतीसाठीचा अर्ज दिसेल. त्यामध्ये योग्य माहिती भरावी.
  • अर्ज भरुन पुर्ण झाल्यावर नमूद केलेले शुल्क भरावे.
  • भरतीसाठी आवश्यक असलेले कागद अर्जाला जोडावे.

Story img Loader