एअरपोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया, कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS) (एअरपोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाची १०० टक्के उपकंपनी (subsidiary)) मध्ये २७४ सिक्युरिटी स्क्रीनर (फ्रेशर) पदांवर गोवा, सूरत, विजयवाडा, लेह, पोर्ट ब्लेअर एअरपोर्ट्ससाठी भरती. (Advt. No. AAICLAS/ HR/ CHQ/ Rect./२०२४ dt. १९.११.२०२४)
पदाचे नाव – सिक्युरिटी स्क्रीनर (फ्रेशर) – २७४ पदे (३ वर्षांच्या कराराने भरती). नेमणुकीचा कालावधी वाढविला जाऊ शकतो.
पात्रता : (दि. १ नोव्हेंबर २०२४ रोजी) पदवी कोणत्याही शाखेतील किमान ६० टक्के गुणांसह (अजा/अज उमेदवारांसाठी किमान ५५ टक्के गुण) उत्तीर्ण. उमेदवारांना हिंदी/ इंग्रजी भाषा वाचता/ बोलता येणे आवश्यक आहे आणि स्थानीय भाषेत संभाषणात पारंगत असावा.
वयोमर्यादा : दि. १ नोव्हेंबर २०२४ रोजी २७ वर्षेपर्यंत (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज/ माजी सैनिक – ५ वर्षे).
निवड पद्धती : इंटरॲक्शन (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आणि कागदपत्र पडताळणी – शॉर्ट लिस्टेड पात्र उमेदवारांना http://www.aaiclas.aero या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.
शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना नेमणूकीपूर्वी पुढील टेस्ट्सना सामोरे जावे लागेल.
(i) डोळा/रंग आंधळेपणा टेस्ट (Eye/ color blindness exam) (ii) unimpaired vision आणि श्रवणशक्ती (hearing ability). (iii) एक्स-रे उपकरणांनी (X- ray equipments) हायलाईट केलेले ऑब्जेक्ट्स ओळखणे. (iv) उत्तम संवाद आणि लेखन कौशल्य. (v) चांगली शारीरिक शक्ती आणि क्षमता.
हेही वाचा >>> नोकरीची संधी : एअरपोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती
३ वर्षांच्या कराराची सुरुवात सर्व सर्टिफिकेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच होईल.
नोकरीचे ठिकाण : देशभरात कोठेही. (सूरत, गोवा, विजयवाडा, लेह, पोर्ट ब्लेअर इ.)
हेही वाचा >>> Success Story : भाड्याच्या घरातून सुरू केलं काम अन् उभारली तब्बल ८,४०० कोटींची संपत्ती
वेतन : निवडलेल्या उमेदवारांना सुरूवातीला रु. १५,०००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनीजना दरमहा एक कॅज्युअल लिव्ह (नैमित्तिक रजा) मिळू शकेल.
ट्रेनिंग दरम्यान घेतल्या जाणाऱ्या परीक्षांतून (यासाठीची फी आणि TA/ DA भत्ता AAICLAS यांचेकडून भरली जाईल.) उत्तीर्ण उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा रु. ३०,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ३२,०००/- आणि तिसऱ्या वर्षी रु. ३४,०००/- वेतन दिले जाईल. मेडिकल इन्श्युरन्सकरिता दरवर्षी रु. १०,०००/- पर्यंतची रकमेची परतफेड केली जाईल.
निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती ठरावीक मुदतीच्या कराराने (FTC) ३ वर्षांच्या कालावधीसाठी केली जाईल. यातील ६ महिन्यांचा कालावधी प्रोबेशन असेल. प्रोबेशन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यास सिक्युरिटी स्क्रीनर पदावर नेमणूक दिली जाईल. त्यांना १८ दिवसांची विशेष रजा (PL) १२ दिवस अर्धपगारी (आजारपणाची रजा) + १ CL + २ RH दिल्या जातील.
AAICLAS पुढील ट्रेनिंग आयोजित करणार आहे. पहिल्या प्रयत्नाकरिता ट्रेनिंगचा सर्व खर्च (ट्रेनिंगसाठी जाण्या-येण्याचा, ट्रेनिंगची फी इ.) AAICLAS करणार आहे.
(१) AVSEC इन्डक्शन कोर्स, (BCAS ने मान्यता दिलेल्या एअरपोर्ट ऑपरेटर/ एअरलाईन यांच्या ASTI’s येथे) कालावधी ५ दिवस.
(२) BASIC AVSEC ला बसण्यापूर्वी ३ महिने कालावधीचा सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटी ऑपरेशन्स कोर्स.
(३) AVSEC BASIC कोर्स – कालावधी १४ दिवस.
(४) सिक्युरिटी इक्विपमेंट्सवरील ४० तासांचे ऑन जॉब ट्रेनिंग (OJT). (एअरपोर्ट येथे)
(५) एअरपोर्ट ऑपरेटर मान्यताप्राप्त ASTI कडून ३ दिवस कालावधीच्या स्क्रीनर्स प्री-सर्टिफिकेशन कोर्स.
(६) BCAS यांचेकडील टेस्टींग आणि स्क्रीनर सर्टिफिकेशन कोर्स २ दिवसांचा.
हे सर्व कोर्स ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त दोन प्रयत्नांत पूर्ण करणे आवश्यक आहे. पहिल्या प्रयत्नात हे कोर्स उत्तीर्ण न करू शकलेल्या उमेदवारांचे स्टायपेंड रु. १५,०००/- वरून रु. १०,०००/- करण्यात येईल, दुसऱ्या प्रयत्नात हे कोर्स उत्तीर्ण न करू शकणाऱ्या उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येईल. पहिल्या प्रयत्नात हे कोर्स उत्तीर्ण न करू शकलेल्या उमेदवारांना दुसऱ्या प्रयत्नासाठी ट्रेनिंग कॉस्ट उमेदवारांना स्वत भरावा लागेल. तसे न केल्यास करार बंद करण्यात येईल.
कामाचे स्वरूप : कार्गो आणि इनलाईन होल्ड बॅगेजचे स्कॅनिंग करणे आणि/किंवा एअरपोर्ट आणि कार्गो कॉम्प्लेक्स येथे इतर सिक्युरिटी कामे पार पाडणे.
शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी hr.recruitment@aaiclas.aero वर संपर्क साधा. हेल्पडेस्क नंबर ०११-२४६६७७१३
अर्जाचे शुल्क : रु. ७५/-.
अर्जासोबत (i) १० वी/१२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र. (ii) पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र, (iii) पदवीचे गुणपत्रक, (iv) कास्ट/ कॅटेगरी सर्टिफिकेट, (v) आधारकार्ड, (vi) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ (viii) अर्जाचे शुल्क ऑनलाइन.
ऑनलाइन अर्ज https://aaiclas.aero/career या संकेतस्थळावर करावेत. अर्जांसाठी मुदत – १० डिसेंबर २०२४ (१७.०० वाजे) पर्यंत.
कस्टम्स मरिन विंगमध्ये संधी
कमिशनर ऑफ कस्टम्स (प्रीव्हेंटिव्ह) (ccp), मुंबई अंतर्गत कस्टम्स मरिन विंगमध्ये एकूण ४४ ग्रुप-सी पदांची भरती. (Advt. No. I(२२) OTH/१३३०/२०२४- P E (M) – R I)
(१) सीमेन – ३३ पदे (अजा – ६, अज – १, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ५, खुला – १३).
पात्रता : (दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी) १० वी उत्तीर्ण आणि समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक बोटीवरील ३ वर्षांचा अनुभव. (यातील २ वर्षांचा अनुभव हेल्मस्मॅन आणि सीमेनशिप कामाचा असावा.)
इष्ट पात्रता : मरिन मर्कंटाईल डिपार्टमेंटने जारी केलेले ‘मेट ऑफ फिशिंग व्हेसल’ सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी.
(२) ग्रीसर – ११ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक बोटीवरील ३ वर्षांचा अनुभव. (यातील २ वर्षांचा अनुभव मेन आणि ॲक्झिलरी मशिनरी मेंटेनन्स कामाचा असावा.)
इष्ट पात्रता : मरिन मर्कंटाईल डिपार्टमेंटने जारी केलेले ‘इंजिन ड्रायव्हर ऑफ फिशिंग व्हेसल’ सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी. उच्च पात्रताधारक उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा : (दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी) दोन्ही पदांसाठी १८२५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे) (३ वर्षांची नियमित सेवा असलेले केंद्र सरकारचे कर्मचारी – खुला – ४० वर्षे, अजा/अज – ४५ वर्षे)
वेतन श्रेणी : लेव्हल-१ (१८,००० ५६,९००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३४,०००/-.
निवड पद्धती : पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी (PET) (स्विमींग) साठी बोलाविले जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्याकीय तपासणी केली जाईल.
आरक्षित जागांवर दावा करणारे उमेदवार किंवा कमाल वयोमर्यादेत सूट घेऊ इच्छिणारे (अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस) उमेदवार सक्षम अधिकाऱ्याने दि. १७ डिसेंबर २०२४ पर्यंत जारी केलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करू शकले नाहीत तर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. इमाव उमेदवारांनी केंद्र सरकारच्या नोकरीसाठी लागणाऱ्या नमुन्यातील नॉन-क्रिमी लेयर दाखला सादर करणे आवश्यक.
अर्जाचे शुल्क : शून्य.
जाहिरात आणि अर्जाचा विहीत नमुना व विस्तृत माहिती http://www.cbic.gov.in, http://www.mumbaicustomszone1.gov.in , http://www.jawaharcustoms.gov.in आणि http://www.accmumbai.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
अनुभवाच्या दाखल्यामध्ये तारखांसहीत अनुभवाचा कालावधी, धारण केलेल्या पदाचे नाव, कामाचे स्वरूप, बोटीचे नाव, रजिस्ट्रेशन क्रमांक आणि नियोक्ता (employer) ने जारी केलेले पेरोल सर्टिफिकेट/सॅलरी स्लीप्स इ. या समावेश असावा.
अर्जावर अलिकडच्या काळात काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. (ज्यावर समोरील बाजूस उमेदवारांनी सही केलेली असावी. उमेदवाराचा चेहरा दृश्यमान असावा, याची काळजी घ्यावी.)
प्रत्येक पदासाठी वेगवेगळे अर्ज (आवश्यक त्या कागदपत्रांसह) वेगवेगळ्या (२८ सें.मी. बाय १३ सें.मी. आकाराच्या) लिफाफ्यामधून पुढील पत्त्यावर स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्टाने दि. १७ डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. The Assistant Commissioner of Customs, P E (Marine), ११ th Floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai – 400001.