महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण करण्यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करते. प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व त्या माहितीचा प्रचार करणे आणि परिसरातील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करते. यासाठी त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत काही भरती केली जाते. अशातच आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो, सीनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट पदांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा नोकरीचे ठिकाण, अर्जाची पद्धत आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ –

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), सिनियर रिसर्च फेलो (SRF), रिसर्च असोसिएट (RA)

एकूण रिक्त पदे – ५६

शैक्षणिक पात्रता

ज्युनियर रिसर्च फेलो – केमिस्ट्री/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मायक्रोबायोलॉजी/ जीवन विज्ञान/ पर्यावरण या विषयात पदव्युत्तर पदवी.

सिनियर रिसर्च फेलो – केमिस्ट्री/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मायक्रोबायोलॉजी/ जीवन विज्ञान/ पर्यावरण या विषयात पदव्युत्तर पदवी + २ वर्षे रिसर्च.

रिसर्च असोसिएट – केमिस्ट्री/ इन्स्ट्रुमेंटेशन/ जीवन विज्ञान/ पर्यावरण विषयात Ph.D + 03 वर्षे रिसर्च.

हेही वाचा- महावितरणमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

वयोमर्यादा –

  • ज्युनियर रिसर्च फेलो – १८ ते २७ वर्षे.
  • सिनियर रिसर्च फेलो – १८ ते ३० वर्षे.
  • रिसर्च असोसिएट – १८ ते ३५ वर्षे.

अधिकृत बेवसाईट – https://www.mpcb.gov.in/

नोकरीचे ठिकाण -संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ६ जुलै २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०२३

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://www.ecmpcb.in/advertisement_recruitment/application_jrf_srf_ra) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment for 56 posts in maharashtra pollution control board has started you can apply till 21st july jap
Show comments