सिडको महामंडळामध्ये ( CIDCO) वर्ग-अ व वर्ग-ब मधील रिक्त पदांची सरळसेवा भरती. एकूण रिक्त पदे – ३८. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(१) उपनियोजनकार (Deputy Planner) वर्ग-अ – १३ पदे (अज – १, विजा-अ – १, भज-क – १, साशैमाव – १, आदुघ – १, खुला – ८) (महिला – २ पदे राखीव) (१ पद दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव).

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हील इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चर/ प्लानिंग विषयातील पदवी आणि टाऊन प्लानिंग/ रिजनल प्लानिंग / सिटी प्लानिंग/ टाऊन अँड कंट्री प्लानिंग/ अर्बन प्लानिंग किंवा समतुल्य मास्टर्स डिग्री/ पदव्युत्तर पदवी.

वेतन श्रेणी : एस-२० रु. ५६,१०० – १,७७,५००, अंदाजे वेतन दरमहा रु. १,१२,०००/-.

(२) कनिष्ठ नियोजनकार ( Junior Planner) वर्ग-ब – १४ पदे (अजा – २, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, इमाव – ३, साशैमाव – १, आदुघ – १, खुला – ४) (३ पदे महिलांसाठी आणि १ पद दिव्यांग कॅटेगरी D/ HH साठी राखीव).

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर ऑफ प्लानिंग किंवा समतूल्य पदवी.

वेतन श्रेणी : एस-१५ रु. ४१,८०० – १,३२,३००, अंदाजे वेतन दरमहा रु. ७८,०००/-.

(३) क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) Field Officer Architect) वर्ग-ब – ९ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, साशैमाव – १, आदुघ – १, खुला – ३) (३ पदे महिलांसाठी आणि १ पद दिव्यांग कॅटेगरी D/ HH साठी राखीव).

पात्रता : B. Arch./ G. D. Arch.आणि SAP GLOBAL सर्टिफिकेशन (इंटिग्रेशन ऑफ बिझनेस प्रोसेस इन SAP ERP ( TERP-१०)).

वेतन श्रेणी : एस-१५ रु. ४१,८०० – १,३२,३००.

अनुभव : संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.

(४) सहयोगी नियोजनकार ( Associate Planner) वर्ग-अ – २ पदे (अजा – १, विजा-अ – १).

पात्रता : सिव्हील इंजिनीअरिंग आर्किटेक्चर किंवा प्लानिंग किंवा समतूल्य पदवी आणि टाऊन प्लानिंग/रिजनल प्लानिंग/अर्बन प्लानिंग किंवा समतूल्य पदव्युत्तर पदवी.

वेतन श्रेणी : एस-२३ रु. ६७,७०० – २,०८,७००.

वयोमर्यादा : (दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी) खुला गट – ३८ वर्षेपर्यंत, मागासवर्गीय (आदुघ/ अनाथ/ खेळाडू) – ४३ वर्षे, दिव्यांग – ४५ वर्षे. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

निवड पद्धती : २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा वेळ १२० मिनिटे, प्रत्येक प्रश्नास २ गुण. इंग्रजी – २५ प्रश्न, सामान्य ज्ञान जनरल अवेअरनेस – २५, आकलन क्षमता (रिझनिंग) – २५ प्रश्न, व्यावसायिक ज्ञान – २५ प्रश्न असे एकूण १०० प्रश्न.

चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. ऑनलाइन परीक्षेमध्ये किमान ९० गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. कनिष्ठ नियोजनकार पदांच्या निवडीसाठी २०० गुणांच्या ऑनलाइन परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातील. वर्ग-अ मधील पदांसाठी अंतिम निवड ऑनलाइन परीक्षेतील गुण आणि मुलाखतीमधील २५ पैकी मिळालेले गुण एकत्रित करून केली जाईल. क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) पदांच्या निवडीसाठी २०० गुणांच्या ऑनलाइन परीक्षेतील गुण आणि सॅप प्रमाणपत्राचे १० गुण मिळून एकूण २१० पैकी गुण गृहीत धरले जातील.

ऑनलाइन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी आल्यास https:// cgrs. ibps. in/ या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा दूरध्वनी क्र. १८०० २२२ ३६६/१८०० १०३ ४५६६ वर संपर्क साधावा. अंतिम निकाल www. cidco. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. १,०००/- जीएसटी रु. १८०/- एकूण रु. १,१८०/-.

ऑनलाइन अर्ज https:// ibpsonline. ibps. in/ cidcogjul२४/ या संकेतस्थळावर ८ मार्च २०२५ पर्यंत करावेत.

suhaspatil237@gmail. com