१२ वी उत्तीर्ण पुरुष/महिला अविवाहित उमेदवारांना डिफेन्समध्ये लेफ्टनंट पदावर भरती होण्याची संधी. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) १ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या एनडीएच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंग्जमधील १५५ वा कोर्स आणि ११७ वा इंडियन नेव्हल अॅकॅडमी कोर्स (INAC) साठी दि. १३ एप्रिल २०२५ रोजी ‘नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अँड नेव्हल अॅकॅडमी एक्झामिनेशन (I) २०२५’ ही प्रवेश परीक्षा घेणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रवेश क्षमता : ४०६ पदे. नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी ३७० जागा. (आर्मी – २०८ (महिलांसाठी – १० जागा), नेव्ही – ४२ (महिलांसाठी – ६ जागा) आणि एअरफोर्स – १२० (फ्लाईंग ब्रँचसाठी – ९२ जागा (यातील २ जागा महिलांसाठी); ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल) ब्रँच – १८ जागा (यातील २ जागा महिलांसाठी); ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – १० जागा (यातील २ जागा महिलांसाठी)). नेव्हल अॅकॅडमी (१० + २ कॅडेट एन्ट्री स्कीम) – ३६ जागा (५ जागा महिला उमेदवारांसाठी).

परीक्षा केंद्र : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद, पणजी इ.

पात्रता : (i) एनडीए आर्मी विंगसाठी – १२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा), (ii) एन्डीएमधील एअरफोर्स आणि नेव्हल विंग्ज आणि इंडियन नेव्हल अॅकॅडमीमधील १० २ कॅडेट एन्ट्रीसाठी – १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयांसह) उत्तीर्ण.

१२ वीच्या परीक्षेला बसणारे उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना १५ डिसेंबर २०२५ पर्यंत १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै २००६ ते १ जुलै २००९ दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड : उंची (पुरुष) एअरफोर्स फ्लाईंग ब्रँचसाठी १६२.५ सें.मी., (पुरुष/महिला) ग्राऊंड ड्युटी ब्रँचसाठी – १५७ सें.मी.; (१८ वर्षांखालील मुला/मुलींना २ सें.मी. ची सूट मिळू शकते.) उंची – महिला – १५२ सें.मी.; आर्मीतील फ्लाईंग ब्रँचसाठी किमान उंची १६३ सें.मी.; वजन – वय आणि उंचीच्या प्रमाणात. नेव्हीसाठी पुरुष – उंची – १५७ सें.मी., महिला – उंची – १५२ सें.मी.

दृष्टी – नेव्हीमधील एन्ट्रीसाठी चष्म्याशिवाय ६/१२, ६/१२; चष्म्यासह – ६/६, ६/६. आर्मी एन्ट्रीसाठी दृष्टी चष्म्याशिवाय ६/३६, ६/३६; चष्म्यासह – ६/६, ६/६. एअरफोर्स विंगसाठी दृष्टी – ग्राऊंड ड्युटी ब्रँचेससाठी चष्म्याशिवाय ६/३६, ६/३६; चष्म्यासह ६/६, ६/६; फ्लाईंग ब्रँचसाठी चष्म्याशिवाय ६/६, ६/९, चष्म्यासह ६/६, ६/६.

हेही वाचा >>> Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती; महिना १ लाखाहून अधिक पगार, ‘असा’ करा अर्ज

इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तंदुरूस्तीकरिता पुढील सराव ठेवावा. (ए) २.४ कि.मी. अंतर १५ मिनिटांत धावणे, (बी) स्किपिंग, (सी) पुशअप्स आणि सिटअप्स (किमान २० प्रत्येकी), (डी) चिनअप्स किमान ६, (इ) रोप क्लाइंबिंग – ३ ते ४ मीटर.

परीक्षा पद्धती : ओएमआर शिटवर उत्तरे फक्त काळ्या बॉल पॉईंट पेननेच मार्क करावयाची आहेत. (ए) लेखी परीक्षा – एकूण ९०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची. पेपर – (१) मॅथेमॅटिक्स कालावधी २ १/२ तास, गुण ३००, पेपर – (२) जनरल अॅबिलिटी टेस्ट कालावधी २ १/२ तास, गुण ६००. पार्ट-ए – इंग्लिश – २०० गुण, पार्ट-बी – जनरल नॉलेज – ४०० गुण. (सेक्शन-ए – फिजिक्स – १०० गुण, सेक्शन-बी – केमिस्ट्री – ६० गुण, सेक्शन-सी – जनरल सायन्स – ४० गुण, सेक्शन-डी – इतिहास, फ्रिडम मुव्हमेंट (सोशल स्टडीज) ८० गुण, सेक्शन-ई – जीओग्राफी – ८० गुण आणि सेक्शन-एफ – करंट इव्हेंट्स – ४० गुण). प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एसएसबी सिलेक्शन सेंटर निवडीसाठी आणि मुलाखतीची तारीख निवडण्यासाठी उमेदवारांनी आर्मीसाठी www.joinindianarmy.nic.in नेव्हीसाठी www.joinindiannavy.gov.in एअरफोर्ससाठी प्रथम पसंती असलेल्या उमेदवारांनी AFSB साठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर लॉगइन करा.

अर्जाचे शुल्क : रु. १००/-

ट्रेनिंग : NDA च्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी निवडलेल्या उमेदवारांना ३ वर्षांचे प्रिलिमिनरी ट्रेनिंग एनडीए, पुणे येथे दिले जाईल आणि इंडियन नेव्हल अॅकॅडमीसाठी निवडलेल्या उमेदवारांना इझिमाला, केरळ येथे ४ वर्षांच्या ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या (अ) आर्मी कॅडेट्सना बी.एस्सी./बी.एससी. (कॉम्प्युटर)/बी.ए.; (ब) नेव्हल कॅडेट्सना बी.टेक. (डिग्री); (क) एअरफोर्स कॅडेट्सना बी.टेक./ बी.एस्सी./बी.एस्सी. (कॉम्प्युटर) डिग्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून दिल्या जातील.

एनडीएमधून उत्तीर्ण – आर्मी कॅडेट्सना – इंडियन मिलिटरी अॅकॅडमी (आय्एम्ए), डेहराडून येथे (१ वर्षाचे ट्रेनिंग); नेव्हल कॅडेट्सना इंडियन नेव्हल अॅकॅडमी, इझिमाला येथे (१ वर्षाचे ट्रेनिंग) आणि फ्लाईंग ब्रँच एअरफोर्स कॅडेट्सना एअरफोर्स अकॅडमी हैद्राबाद येथे (दीड वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल.) एअरफोर्स ग्राऊंड ड्युटी ब्रँच कॅडेट्सना १ वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱया जेंटलमेन कॅडेट्सना आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर, नेव्हल कॅडेट्सना सबलेफ्टनंट पदावर आणि एअरफोर्स कॅडेट्सना फ्लाईंग ऑफिसर पदावर तैनात केले जाईल.

ट्रेनिंग दरम्यान जेंटलमन/ महिला कॅडेट्सना रु. ५६,१००/- स्टायपेंड (दरमहा) दिले जाईल. त्यांचे ट्रेनिंग दरम्यान देय असलेल्या भत्त्यांची थकबाकी ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिली जाईल.

शंकासमाधानासाठी UPSC च्या सुविधा केंद्राचा टेलिफोन नं. ०११-२३३८५२७१/२३३८११२५/२३०९८५४३ विस्तार क्र. ४११९, ४१२० वर कामाच्या दिवशी सकाळी १०.०० ते १७.०० वाजेपर्यंत संपर्क साधावा.

ई-अॅडमिट कार्ड UPSC च्या वेबसाईटवर (upsc.gov.in) परीक्षा सुरू होण्याच्या तारखेच्या अगोदरच्या आठवड्यात शेवटच्या दिवशी उपलब्ध करून दिले जातील. उमेदवारांना जर ई-अॅडमिट कार्ड वेळेवर मिळाले नाही तर त्यांनी ताबडतोब वरील क्रमांकांवर संपर्क साधावा.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी वन टाईम रजिस्ट्रेशन (OTR) करणे आवश्यक. One time registration (OTR) प्रोफाईलमध्ये आयुष्यात फक्त एकदाच बदल करता येईल.

ऑनलाइन अर्ज http://upsconline.gov.in या संकेतस्थळावर दि. ३१ डिसेंबर २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्जात १ ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत काही बदल/सुधारणा करावयाची असेल तर करता येईल.

कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा (I) २०२५ दि. १३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करणार आहे, यातून ४५७ पदांची भरती पुढील कोर्सेससाठी केली जाईल. (Examination Notice No. ०४/२०२५/ CDS- I)

(१) इंडियन मिलिटरी अॅकॅडमी, डेहराडून (आयएमए) – १०० पदे. (१३ पदे. NCC-‘ C’ सर्टिफिकेट (आर्मी विंग) धारकांसाठी राखीव). १६० वा (DE) कोर्स जानेवारी, २०२६ पासून सुरू होणार.

(२) इंडियन नेव्हल अॅकॅडमी (आयएनए), इझिमाला, केरळ – ३२ पदे. (६ पदे. NCC-‘ C’ सर्टिफिकेट (नेव्हल विंग) धारकांसाठी राखीव). एक्झिक्युटिव्ह ब्रँच (जनरल सर्व्हिस/हैड्रो) कोर्स जानेवारी, २०२६ पासून सुरू होणार.

(३) एअरफोर्स अॅकॅडमी, हैद्राबाद (२१९ वा प्री-फ्लाईंग ट्रेनिंग कोर्स) – ३२ पदे. (३ पदे. NCC-‘ C’ सर्टिफिकेट (एअरविंग) धारकांसाठी राखीव) कोर्स जानेवारी २०२६ पासून सुरू होणार.

(४) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (ओटीए), चेन्नई – २७५ पदे (१२३ वा एस्एस्सी (पुरुष) (एन्टी) (UPSC). कोर्स एप्रिल, २०२६ पासून सुरू होणार.

(५) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (ओटीए), चेन्नई – १८ पदे. ३७ वा एस्एस्सी (महिला) (NT) (UPSC) कोर्स) ऑक्टोबर, २०२५ पासून सुरू होणार.

महिला उमेदवार फक्त ओटीए, चेन्नई ‘आर्मी ३७ th SSC Women (NT) UPSC कोर्स’ ट्रेनिंगसाठी पात्र आहेत. त्यांनी अर्जात OTA प्रथम आणि एकच पसंती दाखवावी.

जे उमेदवार एअरफोर्स अॅकॅडमीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी AFA करिता प्रथम पसंती द्यावी. त्यांना कॉम्प्युटर पायलट सिलेक्शन सिस्टीम CPSS ला सामोरे जावे लागेल. जर त्यांनी AFA साठी दुसरा वा तिसरा पसंतीक्रम दिल्यास तो अग्राह्य धरला जाईल.

ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना लग्न करता येणार नाही.

पात्रता : (अ) आय्एम्ए आणि ओटीएसाठी – पदवी (कोणत्याही शाखेतील).

(ब) आयएनएसाठी – इंजिनीअरिंग पदवी.

(क) एअरफोर्स अॅकॅडमीसाठी – पदवी (कोणत्याही शाखेतील) परंतु १२ वी फिजिक्स, गणित विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा इंजिनीअरिंग पदवी.

अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र IMA आणि INA साठी दि. १ जानेवारी २०२६ पूर्वी, एअर फोर्स अॅकॅडमीसाठी १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत, OTA साठी १ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करावेत.

वयोमर्यादा : आयएमए/आयएनए – अविवाहित पुरुष उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी २००२ ते १ जानेवारी २००७ दरम्यानचा असावा.

एअरफोर्स अॅकॅडमीसाठी उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००२ ते १ जानेवारी २००६ दरम्यानचा असावा. (दि. १ जुलै २०२५ रोजी २० ते २४ वर्षे). DGCA कमर्शियल पायलट लायसन्सधारक – जन्म दि. २ जानेवारी २००० ते दि. १ जानेवारी २००६ दरम्यानचा असावा. २५ वर्षांखालील उमेदवार अविवाहीत असावा. २५ वर्षांवरील विवाहित उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (त्यांना married accommodation दिले जाणार नाही.)

(४) ओटीएसाठी अविवाहित पुरुष/ महिला उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी २००१ ते १ जानेवारी २००७ दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड : आर्मीसाठी उंची (पुरुष) फ्लाईंग ब्रँचसाठी १६३ सें.मी., इतर ब्रँचेससाठी – (पुरुष)१५७ सें.मी., (महिला) – १५२ सें.मी.; नेव्हीसाठी (पुरुष) – १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी.; एअरफोर्ससाठी (पुरुष) – फ्लाईंग ब्रँचसाठी १६२.५ सें.मी. ग्राऊंड ड्युटीसाठी १५७ सें.मी., छाती (पुरुष) – किमान ५ सें.मी. छाती फुगविता येणे आवश्यक. वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात वजन असावे. दृष्टी – Uncorrected Vision ६/१२ ६/१२ Corrected Vision R ६/६ L ६/६.

अर्जाचे शुल्क : रु. २००/-. (अजा/ अज/ महिला उमेदवारांना फी माफ आहे.)

अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने दि. ३१ डिसेंबर २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत भरता येईल. पे-इन स्लिप जनरेट करण्यासाठी असलेला ‘ Pay by Cash’ ऑप्शन दि. ३० डिसेंबर २०२४ (२३.५९ वाजता) डिअॅक्टिव्हेट केला जाईल, त्यांना SBI मध्ये फी दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत बँकेच्या वेळेत भरता येईल.

परीक्षा केंद्र : औरंगाबाद/ मुंबई/ नवी मुंबई/ पुणे/ ठाणे, नागपूर, पणजी इ. एसएसबी – मुलाखत (इंटेलिजन्स अँड पर्सोनॅलिटी टेस्ट) – कालावधी ४ दिवस. स्टेज-१ – ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटींग (OIR) टेस्ट आणि पिक्चर परसेप्शन डिस्क्रीप्शन टेस्ट (PP DT). स्टेज-२ – इंटरव्ह्यू, ग्रुप टेस्टींग ऑफिसर टास्क, सायकॉलॉजी टेस्ट्स आणि कॉन्फरन्स. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी पदांचा (कोर्ससाठीचा) आपला पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक. शंका समाधानासाठी संपर्क दूरध्वनी ०११२३३८५२७१/ २३३८११२५/ २३०९८५४३ (कामाच्या दिवशी सकाळी १० ते १७.०० वाजेपर्यंत). ऑनलाइन अर्जात काही बदल/सुधारणा करावयाची असल्यास UPSC च्या वेबसाईटवर १ ते ७ जानेवारी २०२५ (१८.०० वाजेपर्यंत) दरम्यान उपलब्ध असेल. ऑनलाइन अर्ज http://upsconline.gov.in या संकेतस्थळावर दि. ३१ डिसेंबर २०२४ (१८.०० वाजे) पर्यंत करावा. अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती http://www.upsconline.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

‘कोचीन शिपयार्ड’मध्ये २२४ पदे

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) (भारत सरकारचा उपक्रम)मध्ये पुढील जाहिरातींनुसार एकूण २२४ पदांची करार पद्धतीने भरती.

(ए) फॅब्रिकेशन असिस्टंट्स (कंत्राटी) –

(१) शीट मेटल वर्कर – ४२ पदे (२) वेल्डर – २ पदे (बी) आऊटफिट असिस्टंट्स (कंत्राटी) –

(१) मेकॅनिक डिझेल – ११ पदे (२) मेकॅनिक मोटर वेहिकल – ५ पदे (३) प्लंबर – २० पदे (४) पेंटर – १७ पदे (५) इलेक्ट्रिशियन – ३६ पदे (६) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ३२ पदे (७) इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक – ३८ पदे (८) शिपराईट वुड (कारपेंटर) – ७ पदे (९) मशिनिस्ट – १३ पदे (१०) फिटर – १ पद

पात्रता : सर्व पदांसाठी (i) १० वी उत्तीर्ण, (ii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय-एनटीसी सर्टिफिकेट आणि संबंधित ट्रेडमधील ट्रेनिंग/ कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

कराराचा कालावधी : प्रोजेक्टची आवश्यकता आणि उमेदवाराची कामगिरी पाहून ५ वर्षांकरिता नेमणूक दिली जाईल.

वेतन : एकत्रित वेतन दरमहा रु. २३,३००/-. (किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास) ३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असल्यास त्यांच्या अनुभवाची उपयुक्तता तपासून अधिकचे वेतन ठरविले जाईल.

नेमणुकीचे ठिकाण : भारतामधील किंवा परदेशातील सीएसएलच्या कोणत्याही डिपार्टमेंट/ युनिट / प्रोजेक्ट साईट्सवर.

वयोमर्यादा : (दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी) ४५ वर्षांपर्यंत (उमेदवाराचा जन्म दि. ३१ डिसेंबर १९७९ किंवा त्यानंतरचा असावा.) परीक्षा केंद्र : कोची आणि केरळमधील.

अर्जाचे शुल्क : रु. ६००/- ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे.

ऑनलाइन अर्ज www.cochinshipyard.in (Career Page gt; CSL Kochi) या संकेतस्थळावर दि. ३० डिसेंबर २०२४ पर्यंत करावेत