स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI), नवी दिल्ली (युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत एक स्वायत्त संस्था) ५० ‘यंग प्रोफेशनल्स’ पदांची ४ वर्षं कालावधीसाठी करार पद्धतीने भरती. पदाचे नाव – ‘यंग प्रोफेशनल्स’ एकूण रिक्त पदे – ५०.

पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई./बी.टेक. किंवा मॅनेजमेंटमधील २ वर्षांचा पीजी डिप्लोमा किंवा कायदा विषयातील पदवी किंवा एम.बी.बी.एस. किंवा C. A. किंवा ICWA किंवा १२ वीनंतर मिळविलेली ४ वर्षं कालावधीची कोणतीही प्रोफेशनल डिग्री आणि १ वर्षांचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधील डिप्लोमा/ सर्टिफिकेट आणि २ वर्षांचा अनुभव.

IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

वयोमर्यादा : (दि. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी) ३२ वर्षेपर्यंत (इमाव – ३५ वर्षे, अजा/अज – ३७ वर्षे). स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सेवा दिलेल्या उमेदवारांना तेथील अनुभवानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

दरमहा एकत्रित वेतन : रु. ५०,०००/-.

उमेदवारांच्या कामगिरीचा कालबद्ध आढावा घेतला जाईल. त्यानुसार ७ टक्के पर्यंत वार्षिक वेतनवाढ दिली जाईल.

रजा : एका महिन्याच्या कामासाठी २.५ दिवसांची रजा उमेदवारांच्या खात्यावर जमा केली जाईल.

प्रवासभत्ता/दैनिक भत्ता (TA/ DA) – विमानातून इकॉनॉमी क्लासने व रेल्वेने एसी २ टियरने प्रवास करता येईल.

हॉटेलात राहण्यासाठी प्रत्येक दिवसाला रु. २,२५०/-; शहरात टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रत्येक दिवसाला रु. ३३८/- पर्यंत भत्ता; जेवणाकरिता रु. ९००/- पर्यंत.

ऑनलाइन अर्जासोबत पुढील कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रती अपलोड कराव्या लागतील.

(१) जन्मतारखेचा पुरावा – आधारकार्ड, १० वी/१२ वी गुणपत्रिका.

(२) आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाचे प्रमाणपत्र.

(३) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ आणि सिग्नेचर.

(४) केंद्र/ राज्य/ स्वायत्त संस्थांमध्ये सेवारत असल्यास ना हरकत दाखला.

(५) लेटेस्ट लास्ट पे ड्रॉवन सर्टिफिकेट.

निवड पद्धती : प्राप्त अर्जांची छाननी करून (संबंधित कामाचा अनुभव/कामाचे स्वरूप पाहून) पात्र उमेदवारांना इंटरव्ह्यूकरिता शॉर्ट लिस्ट केले जाईल.

अंतिम निवड यादी इंटरव्ह्यूमधील गुणानुक्रमे केली जाईल.

ऑनलाइन अर्ज https:// sportsauthorityofindia. nic. in/ saijobs या संकेतस्थळावर दि. ३० नोव्हेंबर २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.