IRCTC Recruitment 2023: IRCTC मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी महत्त्वाची माहिती. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC), भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने विविध झोनमध्ये पर्यटन मॉनिटर्स आणि हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्सच्या पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र भरती सूचना जारी केल्या आहेत. महामंडळाने पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग आणि दक्षिण मध्य विभागासाठी जारी केलेल्या या भरती अधिसूचनांनुसार, दोन्ही पदांसाठी एकूण १७६ रिक्त पदांच्या भरतीसाठी वेगवेगळ्या तारखांना मुलाखतीचे आयोजन केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३ एप्रिलपासून IRCTC मध्ये मुलाखत सुरू

IRCTC द्वारे जाहिर केलेल्या टुरिझम मॉनिटर्स आणि हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्सच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट irctc.com वरील भरती विभागातील अॅक्टिव्ह लिंकवरून या भरती सूचना डाउनलोड करू शकतात. अर्ज अधिसूचनेतच दिला आहे. हा फॉर्म पूर्णपणे भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख आणि ठिकाण झोननुसार बदलते, जे उमेदवार संबंधित भरती अधिसूचनेमध्ये तपासू शकतात.

हेही वाचा: भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदाच्या २३८ जागांसाठी भरती, सविस्तर माहिती जाणून घ्या

भारतीय रेल्वे (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

IRCTC पर्यटन मॉनिटर्स भरती २०२३ – पश्चिम क्षेत्र
IRCTC हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स भरती २०२३ – पश्चिम क्षेत्र
IRCTC पर्यटन मॉनिटर्स भरती २०२३ – पूर्व विभाग
IRCTC हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स भरती २०२३ – दक्षिण क्षेत्र
IRCTC पर्यटन मॉनिटर्स भरती २०२३ – दक्षिण क्षेत्र
IRCTC पर्यटन मॉनिटर्स भरती २०२३ – दक्षिण मध्य क्षेत्र
IRCTC हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स भरती २०२३ – दक्षिण मध्य क्षेत्र

IRCTC मध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरी

IRCTC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, टूरिझम मॉनिटर्सच्या पदांसाठी, उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यटन विषयात बॅचलर पदवी किंवा पर्यटनातील एका वर्षाच्या डिप्लोमासह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तर हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्सच्या पदांसाठी उमेदवारांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीएससी केलेले असावे. दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे, अधिक तपशीलांसाठी भरती अधिसूचना पहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment for176 posts of tourism and hospitality monitor in irctc walk in interview snk