दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि., मुंबई मार्फत पुढील सहकारी बँकांमध्ये भरती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

I) जीपी पारसिक सहकारी बँक लि., ठाणे;

पदाचे नाव : ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी)

एकूण रिक्त पदे : ७०.

कामाचे ठिकाण : मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, सांगली, नाशिक (महाराष्ट्र राज्यातील); तसेच मापुसा, मडगाव (गोवा राज्यातील) आणि बेळगावी, निपाणी (कर्नाटक राज्यातील).

वयोमर्यादा : ३१ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ३० वर्षे. पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठांची फर्स्ट क्लासमधील पदवी जसे की बी.कॉम./ बीबीए/ बीबीएम/ बीएएफ/ बीएफएम/ बीबीआय/ बीएमएस/ बी.इकॉनॉमिक्स/ बीबीएस (बँकिंग, इन्श्युरन्स आणि को-ऑपरेशन विषयांसह)/ बी.एससी. (आयटी)/ बीई (कॉम्प्युटर)/ बीसीए.

अनुभव : फ्रेशर्स अर्ज करण्यास पात्र आहेत. (एक किंवा दोन वर्षांचा बँकेतील/क्रेडिट सोसायटीज किंवा इतर फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्समधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.)

एम.कॉम./ आयटी/ एमसीए/ एमबीए (बँकिंग अँड फिनान्स किंवा फिनान्स)/ जेएआयआयबी/ सीएआयआयबी/ जीडीसी अँड ए/ आयसीएम, आयआयबीएफ, VAMNICOM कडील बँकिंग, को-ऑपरेशन, लीगलमधील डिप्लोमा असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वेतन : एकत्रित वेतन रु. १५,०००/- दरमहा. परीक्षेचा दिनांक – २३ मार्च २०२५.

टेक्निकल हेल्पसाठी फोन नं. ९१७०२८४९५७२९ (११.०० ते १७.०० वाजे दरम्यान), ई-मेल आयडी help. mucbfexam @gmail. com

(II) वसई विकास सहकारी बँक लि., वसई, जि. पालघर –

पदाचे नाव : कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह (CSR) – मार्केटिंग अँड ऑपरेशन्स (क्लेरिकल ग्रेड).

एकूण रिक्त पदे : १९. एकत्रित वेतन दरमहा : पहिल्या वर्षी रु. १५,०००/-; दुसऱ्या वर्षी – रु. १८,०००/-; तिसऱ्या वर्षी – नोकरीच्या कामकाजातील प्रगतीनुसार कनिष्ठ लिपिक पदांसाठी लागू असलेल्या वेतनावर कायम.

नोकरीचे ठिकाण : पालघर, ठाणे, मुंबई जिल्हा.

वयोमर्यादा : दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी २२ ते ३५ वर्षे.

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एमएस-सीआयटी किंवा समतूल्य संगणक कोर्स.

यांना प्राधान्य देण्यात येईल – (१) JAIIB/ CAIIB/ GDC A उत्तीर्ण तसेच शासनमान्य संस्थेची ICM/ IIBP/ VAMNICOM इ. बँकिंग/ सहकारी/ कायदेविषयक पदविका.

(२) बँका, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव.

(३) महाराष्ट्र राज्यातील पालघर/ ठाणे/ मुंबई जिल्ह्यांत राहत असलेले उमेदवार.

निवड पद्धती : ऑफलाइन परीक्षा (१०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न). परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांची इंटरव्ह्यू घेऊन निवड केली जाईल.

ऑनलाइन अर्ज mucbf. in या संकेतस्थळावर जीपी पारसिक सहकारी बँक लि., ठाणे साठी दि. २८ फेब्रुवारी २०२५ (२३.५९ वाजे) पर्यंत आणि वसई विकास सहकारी बँक लि., वसई, जि. पालघर साठी २७ फेब्रुवारी २०२५ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

सीआयएसएफमध्ये संधी

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ( CISF) मध्ये ‘कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर (ड्रायव्हर फॉर फायर सर्व्हिसेस) (पुरुष)’च्या एकूण १,१२४ पदांची थेट भरती.

रिक्त पदांचा तपशील –

(१) कॉन्स्टेबल ड्रायव्हर – ८४५ पदे (अजा – १२६, अज – ६३, इमाव – २२८, ईडब्ल्यूएस – ८४, खुला – ३४४) (८५ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

(२) कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर ) (ड्रायव्हर फॉर फायर सर्व्हिसेस) – २७९ पदे (अजा – ४१, अज – २०, इमाव – ७५, ईडब्ल्यूएस – २७, खुला – ११६) (२८ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता : दि. ४ मार्च २०२५ रोजी (i) १० वी उत्तीर्ण, (ii) उमेदवाराकडे पुढील प्रकारचे वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. (अ) अवजड वाहन (एचएमव्ही) किंवा ट्रान्सपोर्ट वेहिकल, (ब) हलके वाहन (एलएमव्ही), (क) गियर असलेली मोटर सायकल, (iii) एचएमव्ही किंवा ट्रान्सपोर्ट वेहिकल किंवा एलएमव्ही आणि गियर असलेली मोटर सायकल चालविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.

ऑनलाइन अर्जात उमेदवारांनी आपला पदांसाठीचा पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक.

पात्रता : ३० सप्टेंबर २०२४ रोजी १२ वी (विज्ञान) विषयांसह किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : ४ मार्च २०२५ रोजी २१-२७ वर्षे. कमाल वयोमर्यादेत सूट (इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, माजी सैनिक – सेनादलातील सेवा ३ वर्षे)

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ३ (रु. २१,७०० – ६९,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४४,०००/-.

निवड पद्धती : शारीरिक क्षमता चाचणी (PET), शारीरिक मापदंड चाचणी (PST), कागदपत्र पडताळणी (DV), लेखी परीक्षा आणि वैद्याकीय तपासणी यांचा समावेश असेल.

परीक्षेची तारीख उमेदवारांना CISF वेबसाईट https:// cisfrectt. cisf. gov. in वरून कळविण्यात येईल.

अर्जाचे शुल्क : रु. १००/-. (अजा/ अज/ माजी सैनिक (आरक्षणासाठी पात्र असलेले) यांना फी माफ आहे.) अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने ४ मार्च २०२५ पर्यंत भरता येईल.

अर्जासोबत ही जाहिरात प्रसिद्ध झाल्या दिवसापासून ३ महिन्यांच्या आत काढलेले रंगीत छायाचित्र (ज्यावर उमेदवाराचे नाव फोटो काढल्याची तारीख दर्शविली असेल) आणि १० उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा/१० वीचे गुणपत्रक स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.

परीक्षेच्या ठिकाणी येताना उमेदवारांनी तीन रंगीत छायाचित्रे आणि फोटो आयडेंटिटी प्रूफ (जसे की आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत आणणे आवश्यक.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नंबर ०११-२४३६६४३१/ २४३०७९३३ वर १०.०० ते १८.०० वाजे दरम्यान संपर्क साधावा.

निवड प्रक्रियेच्या वेगवेगळ्या स्तरांवर उमेदवारांनी २-३ दिवस राहण्याच्या तयारीने यावे.

ऑनलाइन अर्ज सीआयएसफ वेबसाईट https:// cisfrectt. cisf. gov. in वर ४ मार्च २०२५ पर्यंत करावेत.

सीआयएसफच्या वेस्टर्न सेक्टरमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात राज्यांचा आणि दादरा नगर हवेली व दीव दमण या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो.

सीआयएसफच्या वेस्टर्न सेक्टर ऑफिसचा पत्ता – डीआयडी, सीआयएसएफ (वेस्ट झोन) हेडक्वार्टर्स, सीआयएसएफ कॉम्प्लेक्स, सेक्टर ३५, खारघर, नवी मुंबई – ४१० २१०. ई-मेल आयडी – digwz@cisf. gov. in

suhaspatil237 @gmail. com