सुहास पाटील
भारतीय वायुसेना ( IAF) मध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात राज्यांतील आणि दमणदिव, दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांमधील पुरुष अविवाहित उमेदवारांची ‘एअरमन (ग्रुप-वाय) (नॉन-टेक्निकल) मेडिकल असिस्टंट’ पदांवर भरती करण्यासाठी दि. २८ मार्च ते ५ एप्रिल २०२४ दरम्यान भोपाळ येथे भरती रॅली घेणार आहे. ( Airmen Intake ०१/२०२४) रॅलीचा कार्यक्रम –
(१) एअरमेन ग्रुप-वाय (मेडिकल असिस्टंट) – ( i) मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील उमेदवारांसाठी दि. २८ व २९ मार्च २०२४;
( ii) महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांतील आणि दमणदिव, लक्षद्विप, दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांतील उमेदवारांसाठी ३१ मार्च व १ एप्रिल २०२४ रोजी.
(२) एअरमेन ग्रुप-वाय (मेडिकल असिस्टंट (डिप्लोमा/बी.एस्सी. (फार्मसी) धारक उमेदवारांसाठी)) – महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांतील आणि दमणदिव, लक्षद्विप, दादरा-नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांतील उमेदवारांसाठी ३ व ४ एप्रिल २०२४.
रॅलीचे ठिकाण – लाल परेड ग्राऊंड, भोपाळ, मध्य प्रदेश.
हेही वाचा >>> नोकरी शोधताय? मुंबईत DGR द्वारे ‘जॉब फेअर’चे आयोजन; जाणून घ्या सर्व तपशील
संबंधित राज्यांतील/ केंद्रशासित प्रदेशातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी नेमून दिलेल्या रॅलीच्या पहिल्या दिवशी सकाळी ६.०० ते १०.०० वाजेपर्यंत हजर रहावयाचे आहे.
पात्रता – (१) १२ वी/व्होकेशनल कोर्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांसह किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण (इंग्रजी विषयात ५० टक्के गुण आवश्यक), (२) डिप्लोमा/ बी.एस्सी. (फार्मसी) पात्रताधारकांसाठी १२ वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांसह किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण इंग्रजी विषयात ५० टक्के गुण आवश्यक आणि फार्मसीमधील डिप्लोमा किंवा डिग्री किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि नाव नोंदणीच्या वेळी उमेदवाराकडे स्टेट फार्मसी काऊन्सिल किंवा फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी आवश्यक. (गुणांची टक्केवारी दाखविताना डेसिमल पॉईंटवरील अंक सोडून पूर्णांक तेवढे दाखवावेत. उदाहरणार्थ ४९.९९ टक्के साठी ४९ टक्के लिहावे.)
हेही वाचा >>> SSC Selection Posts Recruitment 2024 : दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; या विभागांत तब्बल २,०४९ जागांची भरती
वयोमर्यादा – १२ वी पात्रतेवरील मेडिकल असिस्टंट पदांसाठी उमेदवाराचा जन्म दि. २४ जून २००३ ते २४ जून २००७ दरम्यानचा असावा.
डिप्लोमा/ डिग्री फार्मसी पात्रता धारकांसाठी उमेदवाराचा जन्म २४ जून २००० ते २४ जून २००५ दरम्यानचा असावा.
शारीरिक मापदंड – उंची – किमान १५२.५ सें.मी. छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.
वजन – उंची व वय यांचे प्रमाणात. (भारतीय वायुसेनेसाठी लागू असलेले)
श्रवणक्षमता – ६ मीटर अंतरावरील कुजबूज ( Foreaed Whisper) ऐकू येणे आवश्यक.
दात – किमान १४ डेंटल पॉईंट्स (हिरड्या आणि दात उत्तम स्थितीत असावेत.)
दृष्टी – चष्म्याशिवाय – ६/३६ प्रत्येक डोळा, चष्म्यासह – ६/९ ( Coreneal Surgery ( Lasik/ PRK) now allowed)
बॉडी टॅटू – कायमस्वरूपी बॉडी टॅटू चालणार नाहीत. हातावरील ( Fore arms) आतल्या बाजूस असलेले कोपर (elbow) ते मनगट ( wrist) यामधील टॅटू चालू शकतात. हाताच्या पंजाच्या मागच्या बाजूस ( dorsal part of hand) असलेले टॅटू चालू शकतात.
वेतन – ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना रु. १४,६००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना मूळ वेतन अधिक मिलिटरी सर्व्हिस पे मिळून दरमहा रु. २६,९००/- अधिक इतर भत्ते जसे की डी.ए., ट्रान्सपोर्ट अलाऊन्स, कॉम्पोझिट पर्सोनल मेंटेनन्स अलाऊन्स ( CPMA), लिव्ह रेशन अलाऊन्स (LRA), एचआरए इ. अधिक इतर सुविधा जसे की, LTC, रु. ५५ लाखांचे ग्रुप इन्श्युरन्स कव्हर, ग्रुप हाऊसिंग स्कीम्स, रेशन, कपडे, मेडिकल फॅसिलिटीज, अकोमोडेशन, CSD फॅसिलिटीज इ.
(उर्वरित भाग पुढील अंकात)