महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील एकूण ४८० पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. (जाहिरात क्र. ०१/२०२३)

(१) सहायक कक्ष अधिकारी गट-ब – ( i) विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभाग – ५४ पदे (अजा – ६, अज – ३, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – ३, इमाव – ८, साशैमाव – ५, आदुघ – ५, खुला – २२) (२ पदे दिव्यांगांसाठी राखीव), (ii) महाराष्ट्र लोकसेवा आयोग – १ पद (भज-ब).

(२) राज्य कर निरीक्षक गट-ब (वित्त विभाग) २०९ पदे (अजा – २०, विजा-अ – ६, भज-ब – ४, भज-क – २, भज-ड – ४, इमाव – ३७, विमाप्र – १, साशैमाव – २१, आदुघ – २१, खुला – ९३) (८ पदे दिव्यांगांसाठी राखीव).

(३) पोलीस उपनिरीक्षक गट-ब (गृह विभाग) २१६ पदे (अजा – २१, अज – १८, विजा-अ – १५, भज-ब – ५, भज-क – १२, भज-ड – ६, इमाव – ५५, विमाप्र – ८, साशैमाव – २२, आदुघ – २२, खुला – ३२) (२ पदे अनाथांसाठी राखीव).

शैक्षणिक अर्हता पात्रता : (i) सर्व पदांसाठी पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. (पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत). मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्विकारण्यासाठी विहीत केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

हेही वाचा >>> Success Story Of Satyam Kumar : सर्वात कमी वयात IIT मध्ये प्रवेश ते ॲपलमध्ये इंटर्नशिप; वाचा शेतकऱ्याच्या मुलाची यशोगाथा

शारीरिक अर्हता : (१) पोलीस उपनिरीक्षक – पुरुष – उंची – १६५ सें.मी. ; छाती – ७९८४ सें.मी. ; महिला – उंची – १५७ सें.मी.

वयोमर्यादा : (१) राज्य कर निरीक्षक व सहायक कक्ष अधिकारी पदांसाठी – दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी अमागास – १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ खेळाडू – १८४३ वर्षे, दिव्यांग – १८४५ वर्षे. (२) पोलीस उपनिरीक्षक – आमागस – १९-३१ वर्षे, मागासवर्गीय/ अनाथ/ आदुघ – १९-३४ वर्षे, खेळाडू – १९-३६ वर्षे.

वेतनश्रेणी : ( i) पद क्र. १ ते ३ साठी एस्-१४ रु. ३८,६००/- – १,२२,८००/-; अधिक महागाई भत्ता व अधिक नियमांनुसार देय इतर भत्ते. निवड पद्धती : परीक्षेचे टप्पे – (१) सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा – १०० गुण, (२) मुख्य परीक्षा पद क्र. १ ते ३ साठी ४०० गुण, मुख्य परीक्षा संबंधित संवर्गाची/ पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या आणि अभ्यासक्रम लक्षात घेऊन स्वतंत्रपणे आयोजित केली जाईल. पोलीस उपनिरीक्षक पदभरतीसाठी शारीरिक चाचणी १०० गुणांची असेल. शारीरिक चाचणी किमान ६० गुण धारण करणाऱ्या उमेदवारांकरिता ४० गुणांची मुलाखत घेण्यात येईल. पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग व अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा आणि अधिवास प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) असल्याबाबत तसेच नॉन-क्रिमी लेयरमध्ये मोडत असल्याबाबत (अजा/अज वगळून) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.

सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी घेतली जाईल. (सामान्य क्षमता चाचणी – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ १ तास, माध्यम मराठी व इंग्रजी – चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्य शास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धीमापन चाचणी व अंकगणित) परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईद्वारे परीक्षेपूर्वी ७ दिवस अगोदर उपलब्ध होतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. संयुक्त पूर्व परीक्षेस पात्र असल्यास उमेदवार एक, दोन किंवा सर्व पदांसाठी विकल्प (ऑप्शन) देऊ शकतात. संयुक्त पूर्व परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार मुख्य परीक्षेकरिता निवडले जातील.

परीक्षा शुल्क : आमागास – रु. ३९४/-, मागासवर्गीय/ आदुध/ अनाथ/ माजी सैनिक (आमागास/ मागासवर्गीय) रु. २९४/-. परीक्षा शुल्क ऑनलाईन दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत भरणे, तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरिता विहीत अंतिम दि. ६ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत. अर्जाचे शुल्क ऑफलाइन एस्बीआय् चलान मार्फत दि. ७ नोव्हेंबर २०२४ बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत भरता येईल. प्रस्तुत परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या http://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mpsconline.gov.in तसेच https:// mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज https://mpsc.online.gov.in या संकेतस्थळावर दि. १४ ऑक्टोबर २०२४ (१४.०० वाजे)पासून ते ४ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.