सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन आर्मीमध्ये अविवाहीत पुरुष व महिला उमेदवारांना ‘अधिकारी’ पदावर भरती होण्यासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळविण्याकरिता ऑक्टोबर, २०२४ पासून सुरू होणाऱया एन्सीसी स्पेशल एन्ट्री स्कीम ५६ व्या कोर्ससाठी प्रवेश. प्रवेश क्षमता – (पुरुष) – ५० जागा (युद्धात कामी आलेल्या इंडियन आर्मी कर्मचाऱ्यांचे ( Battle Casualty) यांचे पाल्यांसाठी ५ जागा) (ऑक्टोबर २०२४). (महिला) – ५ जागा (४ जागा जनरल कॅटेगरीसाठी आणि युद्धात कामी आलेल्या इंडियन आर्मी कर्मचाऱ्यांचे पाल्य यांचेसाठी १ जागा).

CDSE उमेदवारांसाठी असलेला SSC ( NT) १२० वा कोर्स (ऑक्टोबर २०२४)/ SSC (NT) (महिला) ३४ वा कोर्स (ऑक्टोबर २०२४) किंवा NCC स्पेशल एन्ट्री ५६ कोर्स (ऑक्टोबर २०२४) यापैकी उमेदवार फक्त एका सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ( SSB) इंटरह्यू देवू शकतात.

पात्रता – (१) पदवी (कोणतीही शाखा) किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (पदवीच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पदवी उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल. ज्या उमेदवारांची अंतिम परीक्षा १ ऑक्टोबर २०२४ नंतर होणार आहे, असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.) (२) उमेदवारांनी किमान २/३ शैक्षणिक वर्षेपर्यंत एनसीसीच्या सिनियर डिव्हीजन/विंगमध्ये काम केलेले असावे. (३) एन्सीसी ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षेत किमान ‘बी’ ग्रेड मिळालेले असावे. (युद्धात कामी आलेल्या सैन्य दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना एन्सीसी ‘सी’ सर्टिफिकेट आवश्यक नाही.)

शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७.५ सें.मी., महिला – १५२ सें.मी. वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात वजन असावे. छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.

वयोमर्यादा – (दि. १ जुलै २०२४ रोजी) १९ ते २५ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै १९९९ ते १ जुलै २००५ दरम्यानचा असावा.)

निवड पद्धती – शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना सिलेक्शन सेंटर वाटप जाहीर झाल्याचे कॉल अप लेटर संबंधित सिलेक्शन सेंटरकडून ई-मेल/ एसएमएसद्वारे कळविले जाईल. त्यानंतर उमेदवारांनी इंडियन आर्मीच्या संकेतस्थळावर लॉगइन करून एसएसबीसाठीची तारीख निश्चित करावयाची आहे. एसएसबी इंटरह्यू ५ दिवसांपर्यंत चालेल. एसएसबी इंटरह्यूच्या स्टेज-२ मधून उत्तीर्ण उमेदवारांना मेडिकल एक्झामिनेशन द्यावी लागेल. अंतिम निवड SSB इंटरह्यूनुसार केली जाईल.

एसएसबी सेंटर्स – अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर, कापूरथाळा येथील सिलेक्शन सेंटर्सवर एसएसबी इंटरह्यू घेण्यात येतील.

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना ४९ आठवड्यांचे ट्रेनिंग ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी ( OTA), चेन्नई येथे दिले जाईल. ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना लग्न करता येणार नाही. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रटेजिक स्टडीज’ मद्रास विद्यापीठातर्फे दिला जाईल.

प्रोबेशन – कालावधी ६ महिन्यांचा असेल. निवडलेल्या उमेदवारांना ट्रेनिंग दरम्यान रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट्सना लागू असलेले इतर भत्त्यांची थकबाकी दिली जाईल. ट्रेनिंगनंतर ‘लेफ्टनंट’ पदावर कमिशन दिले जाईल. २ वर्षं पूर्ण झाल्यावर कॅप्टन पदावर बढती मिळेल. ६ वर्षं पूर्ण झाल्यावर मेजर पदावर बढती मिळेल. १३ वर्षं पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळेल.

वेतन – डिफेन्स पे-मॅट्रिक्स लेव्हल-१० (रु. ५६,१००/- – १,७७,५००/-) अधिक मिलिटरी सर्व्हिस पे ( MSP) रु. १५,५००/- व इतर भत्ते. अंदाजे वेतन रु. १,२०,०००/- पेक्षा अधिक असेल. कॅडेट्सना रु. १ कोटीचा विमा संरक्षण दिले जाईल.

सर्व्हिस कालावधी – पुरुष/महिला यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन १४ वर्षांसाठी दिले जाईल. सुरूवातीला १० वर्षे नंतर तो कालावधी ४ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. १० वर्षांच्या सर्व्हिसनंतर पात्र असल्यास उमेदवार परमनंट कमिशनसाठी निवडले जाऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर दि. ६ फेब्रुवारी २०२४ (१५.०० वाजे)पर्यंत करावेत. (Officers Entry Appln/ Login ? Registration ? Click on Apply Online ? A page officers Selection Eligibility will open ? Click on apply ? Click continue)

शंकासमाधानासाठी संबंधित कमिशनकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एसएसबी इंटरह्यूसाठी जाण्या-येण्याचा AC3 TL किंवा बस भाडे परत केले जाईल. www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर Feedback/ Queries ऑप्शन उपलब्ध आहे.

suhassitaram@yahoo.com / carrier