सुहास पाटील

आयुक्त मृद व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र शासन, मृद व जलसंधारण विभागाच्या (Department of Soil and Water Conservation (SWCD) अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हापरिषद यंत्रणेमधील ‘जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित)’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ६७० (अजा – ८५, अज – ५६, विजा-अ – १७, भज-ब – १५, भज-क – १९, भज-ड – १३, विमाप्र – १६, इमाव – १२९, ईडब्ल्यूएस – ६७, खुला – २५३) महिला – ३० टक्के, एकूण – २०१; खेळाडू – ५ टक्के, एकूण – ३४; अनाथ – १ टक्के, एकूण – ७; दिव्यांग – ४ टक्के, एकूण – २७ पदे. (कॅटेगरी D/ HH – ७, OH – ७, SLD – ७, MD – ६ राखीव) वेतन श्रेणी – एस -१५ (४१,८०० – १,३२,३००) अंदाजे वेतन दरमहा रु. ७५,०००/-.

11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
st employees loksatta
एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या, परिवहन मंत्र्यांच्या घोषणेवर संघटना म्हणते…
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
money laundering in immigration
ED On Canada Colleges : कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल

पात्रता : (दि. १० जानेवारी २०२४ रोजी) सिव्हील इंजिनीअरिंग पदविका किंवा सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : दि. १९ डिसेंबर २०२३ रोजी खुला प्रवर्ग – १९ ते ४० वर्षे. (मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ – ४५ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ४७ वर्षेपर्यंत).

निवड पद्धती : मराठी/ इंग्रजी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन परीक्षा (Computer Based Online Examination) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. (मराठी – १० प्रश्न, इंग्रजी – १० प्रश्न, सामान्य ज्ञान – १० प्रश्न, बुद्धिमापन चाचणी – १० प्रश्न, तांत्रिक (विषयाचे ज्ञान) – ६० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे.) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता १/४ गुण वजा करण्यात येतील. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल. उमेदवाराने ३ परीक्षा केंद्रांची निवड करावयाची आहे. ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक. मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.

तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलाविले जाईल. त्याबाबतची यादी व वेळापत्रक https:// swcd. maharashtra. gov. in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षायादी वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्राधान्य देण्यात येईल. त्यास ‘कुटुंबातील मृत शेतकऱ्याचा पाल्य’ म्हणून ठरविल्याबाबतच्या पत्राचा क्रमांक व दिनांक असणे आवश्यक राहील.

परीक्षा शुल्क : अमागास – रु. १,०००/-; मागासवर्गीय/ ईडब्ल्यूएस/ अनाथ/दिव्यांग – रु. ९००/-. याशिवाय बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी अंतिम तारीख १० जानेवारी २०२४ आहे. शंका-समाधानासाठी हेल्पडेस्क क्र. ९५१३४३७७८३.

ऑनलाइन अर्ज सादर करताना अपलोड करावयाची विहीत प्रमाणपत्र/ कागदपत्रे यांची यादी संकेतस्थळावरील जाहिरातीमधील पॅरा १६ मध्ये दिलेली आहे.

ऑनलाइन अर्ज https:// swcd. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर दि. १० जानेवारी २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

© 2024 All Rights Reserved. Powered by Summit

Story img Loader