केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतर्गत विविध कार्यालयांत युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत (UPSC) सिलेक्शन पद्धतीने भरती. (Advt. No. 10/2024)

( I) गृह मंत्रालय, इंटेलिजन्स ब्युरोमधील गुप-ए ची पदे –

(१) डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (टेक्निकल) (DCIO/ Tech) (ग्रुप-ए) – ९ पदे

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ सॉफ्टवेअर इंजिनीअरींग पदवी किंवा एम.एस्सी. (फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेली कम्युनिकेशन विषयांसह)/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/सॉफ्टवेअर किंवा बी.एस्सी. (फिजिक्स) नंतर केलेले एम.सी.ए.

(II) मिनिस्ट्री ऑफ एमएसएमई, डेव्हलपमेंट कमिशनर (एमएसएमई) मधील ग्रुप-बी गॅझेटेड पदे –

(२) असिस्टंट डायरेक्टर ग्रेड- II ( IEDS) ( Chemical) – ५ पदे , (३) असिस्टंट डायरेक्टर ग्रेड- II ( IEDS) (मेटल फिनिशिंग) – २ पदे. पद क्र. २ व ३ साठी पात्रता – एम.एससी. (केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री) किंवा केमिकल टेक्नॉलॉजी/केमिकल इंजिनीअरिंग पदवी.

(४) असिस्टंट डायरेक्टर ग्रेड- II ( IEDS) (फूड) – १९ पदे . पात्रता : बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी) किंवा पी.जी. डिप्लोमा (फूड टेक्नॉलॉजी).

(५) असिस्टंट डायरेक्टर ग्रेड- II ( IEDS) (होजिअरी) – १२ पदे. पात्रता : बी.टेक. (टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी/होजिअरी टेक्नॉलॉजी/ निटींग टेक्नॉलॉजी).

(६) असिस्टंट डायरेक्टर ग्रेड- II ( IEDS) (लेदर अँड फूटवेअर) – ८ पदे पात्रता : बी.टेक. (लेदर टेक्नॉलॉजी).

हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : इजिप्शियन स्मशानभूमीतील भारतीय माकडे अन् भारताचे शेजारी प्रथम धोरण, वाचा सविस्तर..

(III) कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंगमधील ग्रुप-बी गॅझेटेड पदे –

(७) ट्रेनिंग ऑफिसर (वुमन ट्रेनिंग) ड्रेस मेकींग (ग्रुप-बी गॅझेटेड) – ५ पदे, (८) ट्रेनिंग ऑफिसर (वुमन ट्रेनिंग) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ३ पदे

पद क्र. ७ व ८ साठी पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव किंवा संबंधित विषयातील इंजिनिअरींग डिप्लोमा आणि ५ वर्षांचा अनुभव आणि इष्ट पात्रता – संबंधित विषयातील टिचर्स ट्रेनिंग डिप्लोमा.

( IV) सांस्कृतिक मंत्रालय – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) मधील ग्रुप-ए – गॅझेटेड पदे –

(९) पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ – ४ पदे

पात्रता : बी.एससी. (केमिस्ट्री) किंवा एम.एससी. (केमिस्ट्री) अॅनालायटिकल इन्स्ट्रूमेंट्स किंवा ऑरगॅनिक/ इनऑरगॅनिक मटेरियलचे अॅनालिसिस करण्याचा अनुभव. पदवीधारक उमेदवारांसाठी ३ वर्षे आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी १ वर्ष.

(१०) डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्किओलॉजिस्ट – ६७ पदे.

पात्रता : ( i) मास्टर्स डिग्री (आर्किओलॉजी)/ हिस्ट्री (Ancient Indian History किंवा Medivial Indian History या विषयासह)/ ऑन्थ्रॉपोलॉजी (स्टोन एज आर्किओलॉजी विषयासह)/ जीऑलॉजी ( Pleistocene Geology विषयासह), ( ii) पोस्ट ग्रॅज्युएट किंवा अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन आर्किऑलॉजी, ( iii) आर्किओलॉजीमधील कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.

( V) संरक्षण मंत्रालय – डायरेक्टोरेट ऑफ सिव्हीलियन पर्सोनेल अंतर्गत सिव्हील हैड्रोग्राफिक ऑफिसर (ग्रुप-ए) – ४ पदे.

( VI) मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर – डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर अंतर्गत ( i) स्पेशालिस्ट ग्रेड- III – असिस्टंट प्रोफेसर (ग्रेड-ए) – १३१ पदे आणि ( ii) स्पेशालिस्ट ग्रेड- III (ग्रुप-ए) – ३२ पदे.

( VII) मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स – सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट अंतर्गत असिस्टंट डायरेक्टर (हॉर्टिकल्चर) (ग्रुप-बी) गॅझेटेड – ४ पदे.

वरील पदांच्या विस्तृत माहितीसाठी UPSC च्या वेबसाईटवरील Recruitment Section मधील जाहिरात क्र. १०/२०२४ पहावी.

वेतन श्रेणी : पद क्र. १, ९ व १० साठी पे-लेव्हल – १० अंदाजे वेतन दरमहा रु. १.१० लाख. पद क्र. २ ते ८, ११, VII साठी पे-लेव्हल – ७ अंदाजे वेतन दरमहा रु. ८४,८००/-. पद क्र. VI साठी पे-लेव्हल – ११ अंदाजे वेतन दरमहा रु. १.४० लाख.

वयोमर्यादा : पद क्र. १, ९, १० साठी ३५ वर्षे; पद क्र. २ ते ८, ११, VII साठी ३० वर्षे; पद क्र. VI साठी ४० वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे (संबंधित कॅटेगरीसाठी पदे रिक्त असल्यास)).

निवड पद्धती : प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्यास UPSC द्वारे रिक्रूटमेंट टेस्ट घेऊन किंवा इतर पद्धतीने उमेदवारांची संख्या शॉर्ट लिस्ट केली जाईल. अर्जाचे शुल्क : रु. २५/-. ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. १३ जून २०२४ पर्यंत करावेत.