या लेखमालिकेत आपण वेगवेगळ्या शाखा व त्यामधील संधी याबाबत आपण पाहत आहोत. परंतु आता एप्रिल व मे महिन्यात राज्य सामायिक परीक्षा मंडळाकडून विविध प्रवेश परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा इंजिनीअरिंग या शाखेत प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यांनी प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती घेण्यास तसेच कॉलेज निवडण्यास सुरुवात केली आहे. परंतु या व्यतिरिक्त कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेविषयीची माहिती आपण या लेखात पाहू.
● कृषी शिक्षण प्रवेश प्रक्रिया
कृषी शिक्षणाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही प्रामुख्याने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे व राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यामार्फत चालू होते.
प्रवेश पात्रता
बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी यासाठी पात्र आहे. पीसीबी किंवा पीसीएम हे दोन्ही ग्रुप यासाठी पात्र आहेत. तसेच कृषी सामायिक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. यातील गुणांवर प्रवेश ठरविला जातो. याचबरोबर नीट आणि जेईई या प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यालाही पात्र ठरविले जाते.
● कृषी विद्यापीठे
महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, यामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी एकच वेळापत्रक राज्य सामायिक परीक्षा मंडळातर्फे देण्यात येते.
● महात्मा फुले कृषी विद्यापीठ
● डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
● वसंतराव नाईक मराठवाडा ● कृषी विद्यापीठ
● डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
● महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालये
महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय व १५५ खासगी महाविद्यालय आहेत. या सर्व महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी चालू असते.
● शासकीय शिष्यवृत्ती व वसतीगृह निर्वाह भत्ता
वरील सर्व शासकीय व खासगी विनाअनुदानित महाविद्यालयात शासन नियमानुसार शिष्यवृत्ती व वस्तीगृह निर्वाह भत्ता अदा केला जाते. तसेच प्रत्येक महाविद्यालयाचे वार्षिक शुल्क हे शुल्क नियामक मंडळ, महाराष्ट्र यांनी ठरवून दिलेली आहे. प्रवेश घेताना माहितीपुस्तकेत प्रत्येक महाविद्यालयाच्या समोर हे शुल्क दर्शविले जाते.
● शासकीय आरक्षण
शासनाने वेळोवेळी विहित केलेले सर्व आरक्षण मर्यादा या प्रवेशावेळी राज्य सामायिक प्रवेश मंडळातर्फे लागू केल्या जातात.
● कृषी शिक्षणातील शाखा
● कृषी विज्ञान (ऑनर्स)
● उद्यान विद्या
● कृषी वनविद्या
● बी. एफ. एस. सी.
● कृषी अभियांत्रिकी
● कृषी अन्नतंत्रज्ञान
● बी. एस. सी. सामुदायिक विज्ञान
● जैवतंत्रज्ञान
● कृषी व्यवसाय व्यवस्थापन
वरील प्रत्येक शाखेचे प्रवेश एकाच वेळी केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील प्रवेशाचे नियोजन अगोदर करणे गरजेचे आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व इतर राज्यातील उमेदवारांसाठी असलेल्या राखीव जागा वगळता उर्वरित जागांपैकी प्रथम ३० टक्के जागा महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी खुल्या असतील आणि नंतर ७० टक्के जागा या उमेदवार ज्या विद्यापीठ कार्यक्षेत्रामधील महाविद्यालय / शाळा / संस्था येथून अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाला असेल अशा उमेदवारांसाठी असतील. विनाअनुदानित महाविद्यालयांमधील जागांचे वाटप खालील प्रमाणे असेल.
अ) प्रवेश क्षमतेच्या २० जागा संस्थास्तरीय कोटा.
ब) प्रवेश क्षमतेच्या उर्वरित ८० टक्के जागा शासकीय नियमानुसार.
अल्पसंख्यांक संस्थांच्या महाविद्यालयातील ५१ जागा संबंधित अल्पसंख्यांकाकरिता आरक्षित असतील आणि उर्वरित ४९ जागांचे वरील प्रमाणे ३० महाराष्ट्र कोटा आणि ७० विद्यापीठ कोटा याप्रमाणे वाटप करण्यात येईल.सध्या देशात ५३ कृषी विद्यापीठे आहेत. ५ अभिमत विद्यापीठे कृषीचे शिक्षण देत आहेत. ४ केंद्रीय विद्यापीठे आहेत. महाराष्ट्रात ४७ शासकीय महाविद्यालये व १५५ खासगी महाविद्यालय कृषी शिक्षणाची धुरा सांभाळत आहेत. या सर्वांमधून बाहेर पडणारा विद्यार्थी आधुनिक शेतीमध्ये हातभार लावत आहे.
● शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी किती गुणांची टक्केवारी असावी.
● खासगी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी किती गुणाची टक्केवारी असावी
● प्रवेश प्रक्रियेतील वेगवेगळ्या प्रवेश फेरीचे नियोजन कसे करावे.
● प्रवेश अर्ज कसा भरावा.
● विविध विषयांचे भारांकन कसे ग्राह्य धरले जाते या सर्व बाबींची आपण पुढील लेखात माहिती घेऊ.
sachinhort. shinde@gmail. Com