Reserve Bank of India Recruitment 2024 : बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे वित्त मंत्रालयाने आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवार, ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अधिकृत जाहिरातीद्वारे डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत.

आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरच्या भूमिकेसाठी पात्रता काय आहे?

१५.०१.२०२५ रोजी उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अनुभव –

उमेदवाराला सार्वजनिक प्रशासनात किमान २५ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये भारत सरकारमधील सचिव किंवा समकक्ष स्तरावरील अनुभवाचा समावेश आहे. किंवा भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वित्तीय संस्थांमध्ये किमान २५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. संबंधित क्षेत्रात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपवादात्मक गुणवत्ता आणि ट्रॅक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

वेतन

या पदासाठी मासिक वेतन २.२५ लाख रुपये (स्तर -१७) आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय?

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. उमेदवारांना वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात आपला अर्ज जमा करावा लागेल.

हेही वाचा >> मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

RBI बँकेत किती डेप्युटी गव्हर्नर असतात?

मध्यवर्ती बँकेत चार डेप्युटी गव्हर्नर आहेत. एक अर्थतज्ञ, एक व्यावसायिक बँकर आणि बँकेतील २ जणांची मौद्रिक धोरण विभागाची देखरेख करण्यासाठी नियुक्त केली जाते. या समितीच्या अध्यक्षपदावर कॅबिनेट सचिव आहेत. समितीच्या इतर सदस्यांमध्ये वित्तीय सेवा विभागाचे सचिव, आरबीआय गव्हर्नर आणि ३ बाह्य तज्ज्ञांचा समावेश आहे. पात्रा यांची जानेवारी २०२० मध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी पहिल्यांदा डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दोनदा १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reserve bank of india recruitment 2024 deputy governor in rbi know how to apply and what is the salary srk