Resume Writing Tips : कोणत्याही कंपनीचा एचआर तुमचा रेज्युमे अवघ्या काही सेकंदांत वाचतो आणि तुम्हाला नोकरीसाठी कॉल करायचा की नाही हे ठरवतो. त्यामुळे तुमच्या रेज्युमेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असणे गरजेचे आहे. तुम्ही, त्या नेमक्या आठ महत्त्वाच्या गोष्टी रेज्युमेमध्ये अॅड केल्या पाहिजेत, त्या नेमक्या कोणत्या ते आपण जाणून घेऊ…
रेज्युमेमध्ये न विसरता अॅड करा ‘या’ आठ महत्त्वाच्या गोष्टी
१) वैयक्तिक माहिती
सर्वप्रथम तुमच्या रेज्युमेमध्ये तुमची वैयक्तिक माहिती लिहा. जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इ…
२) तुमच्यातील कौशल्य आणि विशेष गुण
वैयक्तिक माहिती भरल्यानंतर त्याखाली तुमच्यातील कौशल्य आणि विशेष गुणांविषयीचा एक सारांश लिहा. त्यामुळे तुमचा रेज्युमे आकर्षक होईल. त्यामुळे एचआरला तुम्ही कोण आहात आणि मागील कंपनीत तुमची काम करण्याची पद्धत नेमकी कशी होती हे कळेल.
३) शिक्षणासंबंधित माहिती
तुमच्या रेज्युमेमध्ये तुमच्या शिक्षणाविषयीची माहिती द्या. जर तुम्ही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाव्यतिरिक्त कोणताही विशेष अभ्यासक्रम किंवा संशोधन केले असेल, तर त्याबद्दल नक्कीच माहिती द्या.
४) कामाचा अनुभव
तुमच्या कामाच्या अनुभवांना जबाबदाऱ्या म्हणून सादर करण्याऐवजी, त्यांना तुमची कामगिरी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही डेटा आणि रेकॉर्ड वापरू शकता. त्यामुळे तुमचा रेज्युमे वेगळा दिसेल.
५) तुम्ही कंपनीसाठी कसे फायदेशीर ठराल?
तुमच्या रेज्युमेमध्ये तुमचे उद्दिष्ट लिहावे लागेल. तुम्ही संबंधित कंपनीसाठी कसे फायदेशीर ठरू शकाल आणि त्यामुळे कंपनी कशी ?प्रगती करू शकते याबद्दल रेज्युमेमध्ये लिहा.
६) तुमच्या सीव्हीमध्ये करा ‘हे’ बदल
प्रत्येक कंपनीच्या मागण्या वेगवेगळ्या असतात म्हणून सर्वत्र एकच रेज्युमे पाठवू नका. जॉब रोलनुसार तुमच्या रेज्युमेमध्ये बदल करा. तुमच्या रेज्युमेमधून तुम्ही पटवून द्या की, त्या नोकरीसाठी तुम्ही कसे योग्य उमेदवार आहात.
७) इंडस्ट्रीबाबत माहिती द्या
तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीसाठी अर्ज करीत असाल, तर तुमच्या रेज्युमेमध्ये तुम्हाला त्या क्षेत्राचे चांगले ज्ञान असल्याचे नमूद करा, ज्यामुळे एचआरचे लक्ष तुमच्या रेज्युमेकडे आकर्षित होईल.
८) प्रभावी शब्द वापरा
तुमची कामगिरी आणि व्यक्तिमत्त्वाचे योग्य वर्णन करण्यासाठी विशेषणांसह योग्य आणि प्रभावी शब्द वापरा. ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडू शकेल.