डॉ श्रीराम गीत

मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर वेगवेगळे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर ये तात. दर महिन्याला एक आगळीवेगळी करिअर घेऊन त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याचं वास्तव दाखवण्याचा हा आरसा’. मुलाच्या संगीत करिअरसाठी झटणाऱ्या आईचा दृष्टिकोन…

book review my journey in lyrics and music memoir of syed aslam noor
 ‘पॉपी’ पर्वाचे पुराण…
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
khirapat panchakhadya naivedya for ganapati festival quick recipe of making khirapat how to make khirapat
गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत; प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा, जाणून घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
Kaustubh Pandharipande faces a big challenge of kidney disease
नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…

सांगली जवळच्या एका छोट्या गावात माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर लग्न झालं म्हणून मी मोठ्या शहरात आले. लहानपणापासूनची मधुरा माझी मैत्रीण. तिला गाण्यांमध्ये खूप गती. मला फक्त गाणी ऐकायला आवडत. त्यामुळे दोघींमध्ये स्पर्धा अशी कधी नव्हती. या उलट एकमेकांना पूरक असल्यामुळे खूप गट्टी होती, ती तशीच टिकली. गमतीची गोष्ट म्हणजे दोघींचे सासर एकाच शहरात आणि दोन गल्ल्या टाकून जवळच. मला मुलगा झाल्यावर हॉस्पिटलमध्ये मधुरा भेटायला आली होती. त्याच वेळेला तिने त्याचे नाव मल्हार ठेवशील ना? असं मला प्रश्नार्थक सुचवलं. मला नाव आवडलं होतंच, प्रश्न होता त्याच्या बाबाला आवडेल की नाही एवढाच. लेखन, वाचन, अभ्यास, काम आणि पैसा यांचीच गरज यशस्वी आयुष्यासाठी असते यावर त्याचा विश्वास. बाळाच्या नावाचा विषय आला त्या वेळेला मी थोड्या आर्जवाने पण आग्रहाने मल्हार हे नाव चालेल का? तुला आवडेल का? असे विचारले. मला आश्चर्याचा धक्काच बसला तो त्याच्या उत्तराने… मधुराने सुचवलेले दिसतंय, तुझी गाण्याची आवड आणि तिचा व्यासंग आपल्या लग्नापासूनच मी पहात आलो आहे. मला हे नाव आवडलं. कारण निदान ‘तानसेन’ नावाचा आग्रह तू धरत नाहीस, असा थोडासा विनोद त्याने केला.

बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात

मल्हार सातआठ महिन्याचा असल्यापासून एखादे सुरेल गाणे रेडिओ वर लागले की ते ऐकण्याकडे त्याची नजर आणि कान सहज वळत असे. थोडा मोठा होऊन चालायला लागल्यानंतर बोलण्याच्या आधीच तो इथून गाण्याचा आवाज येतोय असे बोट दाखवत लक्ष वेधून घ्यायचा. त्याच्या आजी-आजोबांना त्याचे कौतुक वाटायचे. मात्र बाबा अशा केलेल्या कौतुकाकडे फारसे लक्ष देत नसे. मल्हारला केजीत घातले तेव्हापासून मात्र त्याच्या प्रत्येक टीचरने त्याच्या या आवडीबद्दल आवर्जून मला सांगितले व नोंद घेतली. रिपोर्ट कार्डमध्ये केल्या जाणाऱ्या कौतुकाच्या नोंदीमध्ये हा उल्लेख केला असे. पण त्याकडे बाबा वाचले न वाचले असे करून दुर्लक्ष करत असे. आमच्या खूप मोठ्या सोसायटीत गणपती उत्सव हा एक कौतुकाचा विषय असे. मल्हारची खास आवडती अशी तीन-चार गाणी होती की तो स्वत: सुद्धा अध्ये मध्ये गुणगुणत असे. मी भीत भीतच मल्हारचे नाव नोंदवले. कार्यक्रम बसवण्यासाठी उत्साही आज्या होत्या. त्यातील गाण्याचे कार्यक्रम बसवण्याचे काम एकीकडे होते. जेमतेम तिसऱ्याच दिवशी त्या आज्जी मल्हारचे बोट धरून माझ्या घरी आल्या. आणि त्याच्याकडून गणेश वंदना म्हणून घेऊन कार्यक्रम बसवण्याचे प्रास्ताविक त्यांनी मला सांगितले. त्याचे गायन हा साऱ्या सोसायटीतील आबाल वृद्धांचा कौतुकाचा विषय बनला. कार्यक्रमाचे कौतुक दोन-तीन दिवस चालू असतानाच एक अनोळखी आजोबा माझ्या घरी आले. मल्हारचे कौतुक करून न थांबता त्याने त्याला गाण्याची तालीम देण्याबद्दल सुचवले. जसे काही अगदी माझ्या व मधुराच्या मनातलेच ते आम्हाला सांगून गेले. आता मधुराच्या संगतीने आणि तिच्या क्लासमधल्या मुलामुलींबरोबर त्याचे गाणे हळूहळू बहरत होते.

हेही वाचा >>> नोकरीची संधी

कौतुक भिनते डोक्यात

पाचवी ते दहावीचा मल्हारचा अभ्यासाचा प्रवास बाबांच्या छेडछाडीचा आणि मनस्तापाचा विषय असे. कमी मिळणारे मार्क, गणितामध्ये लक्ष न देणे, सायन्स न आवडणे हे सारे आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसाला कसे सहन होईल असे मला वाटत असे. मात्र गाण्याच्या छोट्या छोट्या शाळेतील कार्यक्रमांमध्ये मल्हारचा सहभाग वाढत होता. मधुराने त्याला गाण्याच्या परीक्षा दे. असे दोन तीनदा सुचवले. त्याच्या मागे मी पण लागले. पण परीक्षा हा शब्द काढला की त्याला अभ्यास आणि रियाज दोन्हीचा खूप कंटाळा असे. सारे माझे एवढे कौतुक करतात तर परीक्षेची गरजच काय? असे त्याने जेव्हा मला ऐकवले तेव्हा मात्र माझा बऱ्यापैकी अपेक्षा भंग झाला होता. कला कोणतीही असो त्यासाठी रीतसर प्रशिक्षण हे घ्यावेच लागते यावर माझा ठाम विश्वास, मधुराचा तसा आग्रह. पण मल्हार आता कोणालाच जुमानत नव्हता. दहावीचे जेमतेम फर्स्ट क्लास चे मार्क मिळवून कॉलेजमध्ये जाताना त्याला काहीच अडचण वाटली नाही. कारण मी गाण्यातच करिअर करणार असे त्याने ठामपणे सांगून टाकले होते. याची साशंकता माझ्या मनात होती, बाबांना तर हे आवडलेच नव्हते. मधुराने त्याची रवानगी दुसऱ्या गुरूंकडे केल्यानंतर तो अगदी पाट्या टाकल्यासारखा त्यांचे कडे जाई. काय शिकतो आहेस, काय चालले आहे, त्यात प्रगती किती होतीय याविषयी तो बोलणे टाळत असे. मल्हारची दिशा आता भरकटली आहे काय अशी शंका मला येत असे. या साऱ्याचे खापर माझे डोक्यावर फुटणार असेही वाटू लागले होते. आणि तसेच झाले. पदवी हातात आली, सहा महिने काम नसताना बाबांच्या सांगण्यावरूनच निदान नोकरी मिळाली आणि मी सुस्कारा टाकला. नऊ ते पाच नोकरी करून सायंकाळी मल्हार कधीच घरात नसे. शुक्रवार, शनिवार, रविवार तर तो कायमच कुठल्यातरी थिएटरमध्ये कोणाबरोबर तरी अडकलेला असे. कधी नीट माहिती देत नसे. मल्हारचे वाढते वय, जेमतेम पगार, लग्न कसे होणार याची माझ्या मनातली वाढती काळजी यात भर पडत असतानाच त्याचा फोटो व नावासकट वृत्तपत्रात आलेली जाहिरात त्याच्या बाबांनी मला दाखवली. माझा लेक याबद्दल माझ्याशी एकाही शब्दाने बोलला नव्हता. पण त्या जाहिरातीचे आणि मल्हारच्या गाण्याचे कौतुक बाबाच्या तोंडून ऐकताना मात्र त्याचा गायनाचा सारा प्रवास डोळ्यासमोर लख्खपणे उभा राहिला. स्वत:चा ऑर्केस्ट्रा घेऊन आता मल्हारचे कार्यक्रम होतात. आमच्यासाठी दोन तिकिटे राखून ठेवाल का, असे फोन येतात त्या वेळेला माझे मन आनंदाने भरून येते हे मात्र खरे. यू ट्यूबचा चॅनल माझे हस्ते सुरू करताना आलेला फोटो मात्र आता मी लॅमिनेट करून घरात ठेवला आहे. कधी नव्हे ते माझ्या नवऱ्याने हे सारे तुझ्यामुळे घडले असे कौतुक केले. ते कसे विसरता येईल बरे?