RPF Recruitment 2024 : रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांवर रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचीही जबाबदारी असते. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांमुळे अनेकदा किती तरी प्रवाशांचा जीव वाचला आहे. याच आरपीएफमध्ये लवकरच मेगाभरती होणार आहे. दोन हजार पदांची ही मेगाभरती असून यात १० वी पास उमेदवारांना सुद्धा संधी आहे. त्यासाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) अंतर्गत “RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) आणि कॉन्स्टेबल (Exe.)” पदांच्या एकूण २००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे आरपीएफमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा भरावा, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदाचे नाव

१.RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.)
२.कॉन्स्टेबल (Exe.)

पदसंख्या –

२००० जागा

शैक्षणिक पात्रता –

१.RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) – पदवीधर
२.कॉन्स्टेबल (Exe.) – १० वी पास

भरती प्रकिया खालीप्रमाणे

१.संगणक आधारित परिक्षा
२. शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणी
३. कागदपत्र पडताळणी

हेही वाचा : Pune University Bharti 2024 : पुणे विद्यापीठात १११ पदांसाठी मेगाभरती! मिळणार १ लाखाहून अधिक पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

आवश्यक कागदपत्रे

वयाचा पुरावा म्हणून मॅट्रिकचे प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून दहावी आणि पदवीचे प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र (SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी)
माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र
स्वत:चे दोन रंगीत छायाचित्राच्या दोन प्रती
सरकारची सेवा करत असल्यास सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र
केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरीसाठी विहित नमुन्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील प्रमाणपत्र.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे जमा करावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहितीसाठी https://shorturl.at/aCITZ या लिंकवर दिलेली PDF मधील माहिती नीट वाचावी.
https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईट जाऊन अर्ज करावा.
या भरतीसाठी अधिक माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpf recruitment 2024 how to apply rpf bharti 2024 for the posts of sub inspectors and constables 2000 vacancies are available ndj
Show comments