RRB ALP 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने जारी केलेल्या अधिसुचनेनुसार असिस्टंट लोको पायलटच्या नवीन जागांसाठी भरती केली जाणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) आजपासून असिस्टंट लोको पायलट (ALP) रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करेल. उमेदवार त्यांच्या संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा पोस्टसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करू शकतात.
RRB ALP 2024 : रिक्त पदांची तपशील
रेल्वेत नवीन भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील लाखो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत रेल्वे भरती मंडळाने देशभरातील विविध झोनमध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या ५६०० हून अधिक पदांच्या भरतीसाठी छोटी सूचना (CEN ०१/२०२४) जारी केली आहे. अधिसुचनेनुसार पे मॅट्रिक्स लेव्हल २ अंतर्गत भरती केली जाणार आहे.
RRB ALP 2024 : अर्ज करण्याची तारीख
रेल्वे भर्ती बोर्डाने जारी केलेल्या असिस्टंट लोको पायलटच्या नवीन भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार शनिवार २० जानेवारी २०२४ पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.
RRB ALP 2024 : वयोमर्यादा:
१ जुलै २०२४ रोजी १८-३० वर्षे वयोगटातील उमेदवार असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
RRB ALP 2024 : पात्रता निकष
अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (10वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. १ जुलै २०२४ रोजी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी आणि इतर तपशिलांसाठी अधिसूचना पहा
हेही वाचा – ICSIद्वारे ‘सीआरसी एक्झिक्युटीव्ह’ पदासाठी होणार भरती! अर्ज करण्यासाठी जाणून घ्या पात्रता निकष
RRB ALP 2024 निवड प्रक्रिया:
भरती प्रक्रियेमध्ये पाच टप्प्यांचा समावेश आहे: पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी (CBT 1), दुसरा टप्पा (CBT 2), संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT), दस्तऐवज पडताळणी (DV) आणि वैद्यकीय परीक्षा (ME).
RRB ALP 2024 : ऑनलाइन अर्जाची लिंक – https://www.recruitmentrrb.in/#/auth/landing
RRB ALP 2024 : अधिसुचना – http://surl.li/pnhfs
हेही वाचा – पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! ज्युनिअर इंजिनिअरच्या पदासाठी होणार भरती; जाणून घ्या कसा करू शकता अर्ज
RRB ALP 2024 : अर्ज शुल्क
RRB ने या भरतीसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये ठेवले आहे. पण , SC/ST, EWS, माजी सैनिक तृतीयपंथी आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी शुल्क फक्त २५०रुपये आहे. ऑनलाइन अर्ज करताना शुल्क भरावे लागेल.
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना त्यांच्या निवासस्थानाच्या संबंधित झोनसाठी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल (उदा. – RRB गोरखपूर, RRB पटना, RRB मुंबई, RRB सिकंदराबाद, RRB चेन्नई, इ.). तपशीलवार अधिसूचनेमध्ये तपासू शकता.